पीककर्ज वितरण मेळावे घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:02+5:302021-09-11T04:35:02+5:30
१४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत होणार पीककर्ज वितरण मेळावे बीड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१-२२ करिता ७ सप्टेंबरअखेर ...
१४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत होणार पीककर्ज वितरण मेळावे बीड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१-२२ करिता ७ सप्टेंबरअखेर ६५.०१ टक्के एवढे पीककर्ज वितरण झाल्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ततेच्या उद्देशाने तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खाजगी बँकांच्या वतीने १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे दत्तक गावात अथवा संबंधित बँक शाखेत ‘पीककर्ज वितरण मेळावे’ घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. या मेळाव्यास बँक शाखाधिकाऱ्यांसमवेत संबंधित गावाचे तलाठी, सेवा सहकारी संस्थांचे गट सचिव हे उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या पीककर्ज नूतनीकरणासाठी अथवा नवीन पीककर्जासाठी सदर मेळाव्यास उपस्थित राहून आपली पीककर्जाची मागणी नोंदवावी व पीककर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सदर मेळाव्यात प्राप्त होणारे सर्व मागणीअर्ज ३० सप्टेंबरपूर्वी निकाली काढण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.