रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:05 AM2019-11-25T00:05:18+5:302019-11-25T00:05:50+5:30
येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांविरुध्द संताप व्यक्त करीत वरिष्ठांकडे तक्रार केली.
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांविरुध्द संताप व्यक्त करीत वरिष्ठांकडे तक्रार केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मीरा संतोष उपरे नामक महिलेस खोकल्याचा त्रास होत असल्याने शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास सदर रुग्णाची प्रकृती खालावली. मात्र, तेथे संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते. पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर आल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत कारवाईची मागणी केली. या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत. पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत, पो.नि. खाडे आदींनी रुग्णालयात भेट दिली आहे.