डीजे वाजविणे भोवले, चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:36 AM2021-09-21T04:36:56+5:302021-09-21T04:36:56+5:30

बीड : तालुक्यातील तांदळवाडी हवेली येथे १९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाला डीजे लावून मिरवणूक काढल्याचे समोर आले. ...

DJ playing around, crime against four | डीजे वाजविणे भोवले, चौघांवर गुन्हा

डीजे वाजविणे भोवले, चौघांवर गुन्हा

Next

बीड : तालुक्यातील तांदळवाडी हवेली येथे १९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाला डीजे लावून मिरवणूक काढल्याचे समोर आले. याप्रकरणी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे मालक व चालकावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामीण ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक शांतीलाल गोरे यांनी याबाबत फिर्याद नोेंदवली. त्यानुसार तांदळवाडी हवेली येथे महेश तुपे, राम यमगर व संदीप लोंडे या तिघांनी विनापरवाना गणेशमूर्तीची स्थापना केली. विसर्जनादिवशी डीजे कृष्णा घाडगे (रा. तळेगाव, ता. बीड) यास बोलावून घेत डीजे वाजवला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कोरोना प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन केल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: DJ playing around, crime against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.