पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:53+5:302021-05-21T04:34:53+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील मोठे नाले व नाल्या यांची सफाई पावसाळ्यापूर्वी व्हावी. शहर व परिसरातील अनेक नाले कचरा व ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील मोठे नाले व नाल्या यांची सफाई पावसाळ्यापूर्वी व्हावी. शहर व परिसरातील अनेक नाले कचरा व घाणीने तुडुंब भरलेले आहेत; तर मोठ्या नाल्या व नदीच्या परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. पावसाळ्यापूर्वी स्वछता झाल्यास नाले तुंबणार नाहीत. यासाठी स्वच्छतेची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
मोबाईल सेवा सुरळीत करण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण परिसरात दूरसंचारची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्याने अनेक शासकीय व निमशासकीय यंत्रणा ठप्प होते. त्यामुळे याचा मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. विस्कळीत सेवा सुरळीत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशांक दामोशन यांनी केली आहे.
रस्ते डांबरीकरणाविना
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे. तर अनेक गावांमधील गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी झालेल्या पावसात अनेक रस्ते खचून गेले आहेत. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात चोऱ्या वाढल्या
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यांतून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालवण्यासाठी ठिकठिकाणी केबल अंथरण्यात आली होती. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.
रस्त्यांची दुरवस्था वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात नवीन रस्ते मोठ्या प्रमाणात झाले आहेत. तसेच कॉलनी मध्येही रस्ते झालेले आहेत. शहरात सध्या बांधकामे जोरदार सुरू आहेत. यात अवजड वाहने रेती, विटा वाहतूक मोठया प्रमाणावर करीत असल्याने रस्ते खचत आहेत.