कोरोना चाचणी मुदतीत करा; व्यापाऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:38+5:302021-02-27T04:45:38+5:30

शहरात वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या व्यापारी संख्या सुमारे ७८१ इतकी आहे. त्यात अगदी सकाळच्या दूध विक्रेत्यांपासून भाजीपाला, फळ ...

Do the corona test on time; Appeal to merchants | कोरोना चाचणी मुदतीत करा; व्यापाऱ्यांना आवाहन

कोरोना चाचणी मुदतीत करा; व्यापाऱ्यांना आवाहन

googlenewsNext

शहरात वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या व्यापारी संख्या सुमारे ७८१ इतकी आहे. त्यात अगदी सकाळच्या दूध विक्रेत्यांपासून भाजीपाला, फळ विक्रेते, केश कर्तनालय, भांडी,

कापड, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रिक , इलेक्ट्रॉनिक ,बांगडी ,स्टेशनरी ,

कृषी सेवा केंद्र , होजिअरी तर हाॅटेल ,खानावळ ,पानटपरी ,चहाचे स्टाॅल असे नानाप्रकार आहेत. खरेदी विक्रीसाठी सतत वर्दळ असते. शिवाय त्यांच्याकडे तालुक्यातून नव्हे तर जिल्हा व जिल्ह्याबाहेरील लोकांची आवक जावक चालू असते . प्रथमतः व्यापारी व त्यांचे कामगार कोरोनापासून सुरक्षित असले पाहिजे, यासाठी तहसीलदार श्रीराम बेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी व नगरपंचायत मुख्याधिकारी किशोर सानप यांनी संयुक्त बैठक बोलावली होती.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉ अशोक गवळी व मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सूचना दिल्या. प्रत्येकाने आपली व आपल्याकडे असलेल्या कामगार लोकांची टेस्ट करून घेण्याचे सांगितले. यासाठी मुदतीत टेस्ट करून घेणे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. या बैठकीस शहरातील प्रमुख व्यापारी तुकाराम काळे, मिलन ललवानी, किरण देसरडा, बबनराव ढाकणे, गोरख गाडेकर, सुमती लुनावत, सुधीर देसरडा, गोविंद पाटील, आनंद जावळे आदी उपस्थित होते.

===Photopath===

260221\26bed_29_26022021_14.jpg

===Caption===

कोरोनास आळा घालण्यासाठी शिरुरकासार नगर पंचायत कार्यालयात शुक्रवारी सकाळी तहसिल, आरोग्य विभाग, नगरपंचायत प्रशासन यांनी व्यापारी बैठक बोलावली होती. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी  बैठकीस हजर राहून सकारात्मक प्रतिसाद दिला. 

Web Title: Do the corona test on time; Appeal to merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.