पाटोद्यात कमिशन थकल्याने तूर खरेदी नाही; थकबाकी शेतकर्‍यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:21 PM2018-02-02T18:21:07+5:302018-02-02T18:22:11+5:30

पाटोदा खरेदी-विक्री सहकारी संस्थेस धान्य खरेदीसाठी दिला जाणारा खर्च आणि कमिशनचे पैसे न मिळाल्याने चालू हंगामात तूर खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हमालांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Do not buy tur due to exhausted commission at patoda ; On the issue of outstanding farmers | पाटोद्यात कमिशन थकल्याने तूर खरेदी नाही; थकबाकी शेतकर्‍यांच्या मुळावर

पाटोद्यात कमिशन थकल्याने तूर खरेदी नाही; थकबाकी शेतकर्‍यांच्या मुळावर

googlenewsNext

बीड : पाटोदा खरेदी-विक्री सहकारी संस्थेस धान्य खरेदीसाठी दिला जाणारा खर्च आणि कमिशनचे पैसे न मिळाल्याने चालू हंगामात तूर खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हमालांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासनाने नाबार्डच्या माध्यमातून गतवर्षी तूर व इतर धान्य खरेदी केले. या वर्षी सोयाबीन, उडीद, मूग या धान्याची खरेदी केली. बाजार समितीअंतर्गत तालुका खरेदी - विक्र ी संस्थेने खरेदी केंद्र चालवले. धान्य खरेदीसाठी जिल्हा मार्केटींग कार्यालयाकडून बारदाणा पुरवला गेला अनुषंगिक खर्च रोखीने देण्याचे धोरण आहे. रोख रकमेमधून हमाल, हंगामी कर्मचारी, वाहतुकीसाठीचा खर्च करण्यात येतो.

याशिवाय संस्थेला यासाठी कमीशन दिल्या जाते.  खरेदी - विक्र ी संस्थेने गतवर्षी केलेल्या खरेदीपोटी जुजबी रक्कम देण्यात आली. चालू हंगामासाठी अद्याप पैसे दिले गेले नाहीत. परिणामी हमाल, हंगामी कर्मचारी, वाहतूकदारांनी पैशासाठी तगादा लावला आहे. शिवाय अगोदरचे पैसे मिळाल्याशिवाय नव्याने काम करणार नसल्याचा निर्णय संस्थेस कळवला आहे. तूर खरेदी न करण्याचा निर्णय चालू हंगामातील तूर खरेदीचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. येथील संस्थेकडे सुमारे तीनशे शेतकर्‍यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र कामासाठीचे आणि कमीशनचे पैसे मिळाले नसल्याने संस्थेने तूर खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांची अडचण
खरेदी-विक्री संस्थेस धान्य खरेदीसाठी दिला जाणारा खर्च आणि कमीशनचे पैसे न मिळाल्याने घेतला निर्णय. मिळणार्‍या रोख रकमेतून हमाल, हंगामी कर्मचारी, वाहतुकीसाठीचा खर्च हे जुने येणे मिळाल्याशिवाय काम न करण्याचा निर्णय. जिल्हा मार्केटींग कार्यालयाने मोबदला न दिल्याने ३० लाख येणे आहे. हमाल, कर्मचारी, वाहतूकदारांनी थकित मिळाल्याशिवाय काम करणार नसल्याचे सांगितल्याने तूर खरेदी सुरू करता येणार नाही.
- सतीश जाधव, व्यवस्थापक, ख.वि. संस्था

Web Title: Do not buy tur due to exhausted commission at patoda ; On the issue of outstanding farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.