'घाण करणार नाही, करू देणार नाही'; बीडच्या जिल्हा रूग्णालयात डॉक्टर, कर्मचारी, रूग्णांनी घेतली स्वच्छतेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:57 AM2019-01-30T11:57:21+5:302019-01-30T11:58:41+5:30

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण वासनवाडी व जिल्हा रूग्णालय यांच्या संयूक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

'Do not dirty, will not let'; Doctors, employees and patients in Beed's district hospital took oath of cleanliness | 'घाण करणार नाही, करू देणार नाही'; बीडच्या जिल्हा रूग्णालयात डॉक्टर, कर्मचारी, रूग्णांनी घेतली स्वच्छतेची शपथ

'घाण करणार नाही, करू देणार नाही'; बीडच्या जिल्हा रूग्णालयात डॉक्टर, कर्मचारी, रूग्णांनी घेतली स्वच्छतेची शपथ

googlenewsNext

बीड : घाण करणार नाही, करू देणार नाही, अशी शपथ आज सकाळी जिल्हा रूग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारीका, कर्मचाऱ्यांसह रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेतली. यावेळी प्रत्येक वॉर्डमध्ये जावून संत गाडगे बाबा यांची वेशभूषा केलेल्या मुकादमाने स्वच्छतेची जनजागृती केली. 

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण वासनवाडी व जिल्हा रूग्णालय यांच्या संयूक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला अतिरिक्ति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही. शिंदे, बालरोग तज्ज्ञ डॉ.हनुमंत पारखे, मेट्रन विजया सांगळे, परिसेविका विजया शेळके, संगीता सिरसाट, दिंडकर, प्रतिष्ठाणचे तत्वशील कांबळे, हरणमारे, मुकादम हजारे आदींची प्रमुख उपिस्थती होती. 

सुरूवातील सर्व रूग्ण,  नातेवाईक, डॉक्टर, परिचारीका, कर्मचा-यांना मेट्रन विजया सांगळे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर प्रत्येक वॉर्डमध्ये जावून संत गाडगे बाब यांची वेशभूषा परिधान करून मुकादम हजारे यांनी जनजागृती केली. तसेच स्वच्छतेची महत्वही पटवून दिले.

Web Title: 'Do not dirty, will not let'; Doctors, employees and patients in Beed's district hospital took oath of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.