डॉक्टर बाहेरून औषधी आणायला सांगतात, जेवणही वेळेवर येत नाही - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:01+5:302021-07-14T04:39:01+5:30

बीड : जिल्हा रुग्णालयासह कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तक्रारी कमी होत नसल्याचे दिसत आहे. आजही काही डॉक्टर ...

The doctor asks you to bring medicine from outside, the meal does not come on time - A | डॉक्टर बाहेरून औषधी आणायला सांगतात, जेवणही वेळेवर येत नाही - A

डॉक्टर बाहेरून औषधी आणायला सांगतात, जेवणही वेळेवर येत नाही - A

Next

बीड : जिल्हा रुग्णालयासह कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तक्रारी कमी होत नसल्याचे दिसत आहे. आजही काही डॉक्टर शासकीय रुग्णालयात औषधी नसल्याचे सांगत सर्रासपणे बाहेरुन औषधी आणायला सांगत आहेत, तसेच जेवण येते; परंतु ते वेळेवर येत नसल्याच्या तक्रारीही तेवढ्याच असल्याचे समोर आले आहे. असे असतानाही अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

शासकीय आरोग्य संस्थेत दाखल रुग्णांना सर्व औषधी व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही त्याच संस्थेची आहे; परंतु जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना सर्रासपणे बाहेरुन औषधी आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जात आहे. याबाबत उपसंचालक डॉ. एकनाथ माले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी वारंवार सूचना करूनही परिस्थिती सुधारत नसल्याचे दिसते, तसेच जेवणाबाबतही तक्रारी कायम असून रोष व्यक्त हाेत आहे.

अंतर्गत वाद कमी करण्याचेही आव्हान

n जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्यातील अंतर्गत वादाची रोज एक तक्रार डॉ. साबळे यांच्याकडे येत आहे. एका डॉक्टरने ड्यूटीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याची तक्रार केली, तर कोरोना वॉर्ड क्रमांक ७ मधील एक महिला डॉक्टर व सर्व परिचारिका, वॉर्डबॉय व इन्चार्जने एकमेकांविरोधात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली आहे.

खासगी मेडिकलवाल्यांसोबत मिलीभगतचा आरोप

n जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना सर्रासपणे बाहेरुन औषधी आणण्यास सांगितले जात आहे. उपसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सकांनी वारंवार सांगूनही काही डॉक्टर चिठ्ठी लिहून देत आहेत.

n कोरोनाकाळात भरती केलेल्या डॉक्टरांकडूनच असे प्रकार जास्त केले जात आहेत. या डॉक्टरांची रुग्णालयाबाहेरील खासगी मेडिकलवाल्यांशी मिलीभगत असल्याचा आरोपही काही रुग्ण करत आहेत.

काही डॉक्टर नुसतेच पाहुण्यासारखे विचारतात

जिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर झोपलेल्या रुग्णांना जागे करून त्यांची तपासणी करतात, तसेच त्यांच्यावर उपचार करण्यासह त्यांना आधार देण्याचेही काम करतात.

अशा काही डॉक्टरांबद्दल कोरोनामुक्त झालेले रुग्ण घरी गेल्यावरही गावभर सांगून कौतुक करतात; परंतु काही डॉक्टर याला अपवाद असून ते रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहेत.

रुग्णांना हात लावून तपासणी करण्याकडे अथवा त्यांची जवळ जाऊन विचारपूस करण्यास दुर्लक्ष करतात. केवळ आता कसं वाटतंय, अशी पाहुण्यासारखी विचारणा करून पुढे जात असल्याचे सांगण्यात आले.

सूचना केल्या आहेत

जेवण वेळेवर देण्यासह योग्य व तत्पर उपचार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. मी स्वत: वॉर्डात जाऊन राऊंड घेऊन रुग्णांशी संवाद साधतो. थोड्याफार त्रुटींमध्ये लगेच सुधारणा होते. जेवण व उपचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरांची माहिती घेतो. यातही सुधारणा होईल.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

Web Title: The doctor asks you to bring medicine from outside, the meal does not come on time - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.