डॉक्टरला सायबर भामट्याचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:35+5:302021-09-17T04:40:35+5:30

अंबाजोगाई : एसबीआय बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवून सायबर भामट्याने स्वाराती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यास ‘एनी डेस्क’ ॲप ...

Doctor to cyber villain | डॉक्टरला सायबर भामट्याचा गंडा

डॉक्टरला सायबर भामट्याचा गंडा

Next

अंबाजोगाई : एसबीआय बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवून सायबर भामट्याने स्वाराती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यास ‘एनी डेस्क’ ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर ५८ हजार रुपये परस्पर काढून घेतले. २५ मे रोजीच्या घटनेत १५ सप्टेंबरला शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

एकनाथ रमेश वाघिरे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. २५ मे रोजी त्यांनी बँकेच्या हेल्पलाईन नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एका क्रमांकावरून कॉल आला. सदरील व्यक्ती बँकेची कर्मचारी असेल असे समजून एकनाथ यांनी त्याच्याशी चर्चा केली. बोलण्यात गुंतवून भामट्याने त्यांना मोबाईलवर ‘एनी डेस्क’ ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. ‘एनी डेस्क’ हे रिमोट कंट्रोल ॲप असल्याने एकनाथ यांच्या मोबाईलचे सर्व कंट्रोल त्या भामट्याच्या हाती गेले. त्याने वेगवेगळे तीन व्यवहार करत त्यांच्या खात्यातून ५८,००७ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी शहर ठाणे गाठले.

...

कॅशबॅकच्या नावाखाली महिलेची फसवणूक

बीड : ‘फोन पे’वरून कॅशबॅक मिळाल्याचे आमिष दाखवून मंजुश्री परशुराम चौरे (रा. अंबिका नगर, बीड) यांना ९ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ३० ऑगस्टला घडला. यावरून १५ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

३० ऑगस्टला त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. तुम्ही फोन पेवरून केलेल्या रिचार्जमुळे कॅशबॅक भेटले आहे, असे सांगून त्याने ओटीपी विचारला. त्याच्यावर विश्वास ठेऊन ओटीसी सांगताच त्यांच्या खात्यातून ९ हजार ८०० रुपये त्याने काढून घेतले.

Web Title: Doctor to cyber villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.