फेक कस्टमर केअर नंबरचा डॉक्टरला फटका; सायबर भामट्यांनी 'एनीडेस्क'ने बँकखाते केले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:09 PM2022-12-28T14:09:49+5:302022-12-28T14:10:02+5:30

पार्सल रिटर्न करण्यासाठी गुगलवरून मिळवला होता कस्टमर केअर नंबर

Doctor hit by fake customer care number; Bank accounts emptied by using 'AnyDesk' app by cyber criminals | फेक कस्टमर केअर नंबरचा डॉक्टरला फटका; सायबर भामट्यांनी 'एनीडेस्क'ने बँकखाते केले रिकामे

फेक कस्टमर केअर नंबरचा डॉक्टरला फटका; सायबर भामट्यांनी 'एनीडेस्क'ने बँकखाते केले रिकामे

Next

माजलगाव (बीड) : फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनीकडून आलेले पार्सल परत करण्यासाठी गुगलवर कंपनीचा कस्टमर केयर नंबर सर्च करणे एका डॉक्टरांना चांगलेच महागात पडले. संबंधीत डॉक्टरांनी गुगल सर्च करून एक मोबाईल नंबर मिळवला. मात्र त्या मोबाईलवरून बोलणार्‍या भामट्याने त्यांना एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. हे अ‍ॅप डाऊनलोड करताच डॉक्टरांच्या खात्यातील 75 हजाराची रक्कम सायबर भामट्यांनी पळवली. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ.शामसुंदर दगडूराम काकाणी (रा.समता कॉलनी माजलगाव)असे फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. फ्लिपकार्टवर त्यांनी एक पार्सल मागवले होते. मात्र ते पार्सल त्यांना परत करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून फ्लिपकार्ट कस्टमर केयरचा नंबर शोधला. तेथे त्यांना इंडिया कस्टमर केयर असा उल्लेख आढळला. तसेच त्याठिकाणी कॉल नॉउ असा उल्लेख असल्याने त्यावर त्यांनी क्लिक केले असता एक नंबर स्क्रिनवर दिसला. डॉ. काकाणी यांनी त्या नंबरशी संपर्क केला असता समोरून बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. 

त्याच्यावर विश्वास ठेवत डॉ.काकाणी यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड केले अन इथेच त्यांची फसवणूक झाली. पार्सल तर परत पाठवता आलेच नाही मात्र सायबर भामट्याने खात्यातील 75 हजार रुपय पळवून डॉक्टरला चुना लावला . याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात डॉ.काकाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Doctor hit by fake customer care number; Bank accounts emptied by using 'AnyDesk' app by cyber criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.