अंबाजोगाईत डॉक्टरांचे दातृत्व, रुग्णास एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:51+5:302021-05-28T04:24:51+5:30

अंबाजोगाई : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी रुग्णास पुढील उपचारासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन पोतदार यांनी एक लाख ...

Doctor's charity in Ambajogai, one lakh help to the patient | अंबाजोगाईत डॉक्टरांचे दातृत्व, रुग्णास एक लाखाची मदत

अंबाजोगाईत डॉक्टरांचे दातृत्व, रुग्णास एक लाखाची मदत

Next

अंबाजोगाई : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी रुग्णास पुढील उपचारासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन पोतदार यांनी एक लाख रुपयांची मदत करून उपचारासाठी दिलासा दिला.

होळ येथील अल्प भूधारक शेतकरी चंद्रकांत शिंदे हे म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. आतापर्यंत या गरीब कुटुंबाचा उपचारावर साडेचार लाखांचा खर्च झाला आहे. तरीदेखील उपचारासाठी आणखी जास्त खर्च अपेक्षित आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई येथील ‘आधार डायग्नोस्टिक’चे संचालक डॉ. नितीन पोतदार यांनी सामाजिक भावनेतून या रुग्णाच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. मदतीच्या रकमेचा धनादेश चंद्रकांत यांच्या पत्नी उमा शिंदे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. एवढेच नव्हे तर भविष्यातही आणखी मदतीची तयारी डॉ. पोतदार यांनी दर्शविली आहे.

फोटो : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी रुग्णास अंबाजोगाई येथील डॉ. नितीन पोतदार यांनी एख लाख रुपयांची मदत करीत सामाजिक बांधिलकी जपली. मदतीचा धनादेश उमा चंद्रकांत शिंदे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

===Photopath===

270521\avinash mudegaonkar_img-20210527-wa0019_14.jpg

===Caption===

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी रुग्णास अंबाजोगाई येथील डॉ. नितीन  पोतदार यांनी एक लाख रूपयांची मदत करीत सामाजिक बांधिलकी जपली.  मदतीचा धनादेश उमा चंद्रकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Web Title: Doctor's charity in Ambajogai, one lakh help to the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.