डॉक्टरांनो...घाबरू नका, घाबरवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:28 PM2020-03-18T23:28:30+5:302020-03-18T23:29:11+5:30

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूबद्दल हाहाकार माजला आहे. परंतु याचा सामना तुमच्या लढ्याने आणि सामान्यांच्या मदतीने करावयाचा आहे. अशा वेळी आपण घाबरू नका आणि इतरांनाही घाबरवू नका, अशा दिलासादायक सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना दिल्या.

Doctors ... don't panic, don't panic | डॉक्टरांनो...घाबरू नका, घाबरवू नका

डॉक्टरांनो...घाबरू नका, घाबरवू नका

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरससंदर्भात जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षण : बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांना दिलासा, प्रोत्साहन अन् सूचना

बीड : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूबद्दल हाहाकार माजला आहे. परंतु याचा सामना तुमच्या लढ्याने आणि सामान्यांच्या मदतीने करावयाचा आहे. अशा वेळी आपण घाबरू नका आणि इतरांनाही घाबरवू नका, अशा दिलासादायक सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना दिल्या. कोरोनासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच शासकीय डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात प्रशिक्षण दिल्यानंतर रेखावार यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना विषाणूने बाधीत असलेल्या रुग्ण कोणाता, संशयीत कोणता, कोणाला विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात दाखल करायचे? रुग्ण कसा ओळखायचा, सामान्यांना कसे मार्गदर्शन करायचे, त्यांना आधार आणि उपचार कसे करायचे? याबाबत आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आले. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.अमोल गायकवाड यांनी कोरोनाबद्दलचे समज, गैरसमज डॉक्टरांना समजावून सांगण्यासह काळजी घेण्याबाबत उपाययोजना सुचविल्या. दुर्दैवाने एखादा रुग्ण बाधीत असल्याचे समजताच आपण कशी काळजी घ्यायची, त्याच्यावर कसे आणि काय उपचार करायचे, याबाबत सुचना केल्या.दरम्यान आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनीही प्रशिक्षणाला भेट देत मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या लातूर परिमंडळाचे समन्वयक डॉ.अमोल गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य डॉ.आर.बी.पवार यांच्यासह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे, मुंबईहून आलेल्यांनीही तपासणी करावी
पुणे, मुंबईतही कोरोना आजाराने थैमान घातले आहे. सुट्टयांमुळे तर काही लोक भितीने परतत आहेत. परतलेल्या लोकांना काही लक्षणे जाणवताच त्यांनी जवळच्या आरोग्य संस्थेत जावून स्वता:हुन तपासणी करून घ्यावी. किंवा आपल्याला समजले तरी आपण त्यांना (लक्षणे असतील तरच) तपासणीसाठी बोलवावे, अशा सुचनाही राहुल रेखावार यांनी डॉक्टरांना दिल्या.
दरम्यान, सुटी व कोरोनाच्या भीतीने मुंबई, पुण्याहून बीडला येणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ज्या लोकांना लक्षणे जाणवत आहेत त्यांनी घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य संस्थेत जावून तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात ११ ठिकाणी अलगिकरण कक्ष तयार
बीडसह प्रत्येक तालुक्यात एक अलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले किंवा संशयीत असलेल्या नागरिकांना या कक्षात ठेवण्यात येणार आहे. सर्व जागा निश्चीत झाल्या असून सीएस, डीएचओंनी याचा आढावाही घेतला आहे.

Web Title: Doctors ... don't panic, don't panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.