सिद्धेश्वर संस्थानच्या गोशाळेस चारा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:33 AM2021-05-10T04:33:49+5:302021-05-10T04:33:49+5:30
१)लिंबा सिद्धेश्वर संस्थानच्या गोशाळेस चारा दान शिरूर कासार : येथील सिद्धेश्वर संस्थानच्या गोशाळेतील गायीसाठी चारा देण्याचे आवाहन संस्थानचे ...
१)लिंबा
सिद्धेश्वर संस्थानच्या गोशाळेस चारा दान
शिरूर कासार : येथील सिद्धेश्वर संस्थानच्या गोशाळेतील गायीसाठी चारा देण्याचे आवाहन संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत रविवारी अर्जुन रणखांब यांनी अकराशे बाजरीचे सरमाड चारा दान म्हणून दिला. यावेळी महंत विवेकानंद शास्त्रींसह डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमणलाल बडजाते, रामदास आघाव, अक्षय रणखांब, अर्जुन रणखांब, प्रमोद दगडे, गोकुळ पवार उपस्थित होते.
पुन्हा पावसाळी वातावरण
शिरूर कासार : दोन दिवस वातावरण निळलले असतानाच रविवारी पुन्हा आभाळ जमा होत पाऊस येतो की काय असे वाटू लागले आहे. सध्या उन्हाळी बाजऱ्या काढणीला आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
बांधकामाचा धडाका
शिरूर कासार : शहरात नवीन बांधकाम, जुन्याची दुरुस्ती कामाचा धडाका सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कामे आटोपती घेण्यासाठी धांदल सुरू आहे. त्यामुळे मजुरांना रोजगाराचा आधार होत आहे.
मे हीट जनावरांसाठी त्रासदायक
शिरूर कासार : तालुक्यात मे महिन्यात उष्णतेने पायरी ओलांडली असून वाढते तापमान हे मुक्या जनावरांसाठी त्रासाचे ठरत आहे. शक्यतो आपले पशुधन सावलीला बांधा, दुभत्या जनावरांच्या पाठीवर ओले पोते ठेवा, पाणी पोटभर पाजा, उन्हाच्या वेळी बैलांना कामाला जुंपू नका. वाढती उष्णता शेतकरी व त्याचे पशुधन यांना त्रासदायक असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी सांगितले.
===Photopath===
090521\vijaykumar gadekar_img-20210509-wa0040_14.jpg