सदाविजय आर्य यांच्याकडून सव्वाशे कविता ग्रंथांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:10+5:302021-04-17T04:33:10+5:30
प्राचार्य सदाविजय आर्य हे सत्तरच्या दशकात ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य करण्याच्या प्रेरणेने कर्नाटक सीमेवरील औराद शहाजनी येथे आले ते ...
प्राचार्य सदाविजय आर्य हे सत्तरच्या दशकात ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य करण्याच्या प्रेरणेने कर्नाटक सीमेवरील औराद शहाजनी येथे आले ते तेथील महाविद्यालयात अनेक वर्षे प्राचार्य होते. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या आंतरभारती या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
प्राचार्य आर्य यांनी देणगी दिलेल्या पुस्तकांत बहुतेक हिंदी कविता ग्रंथ आहेत. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथ ही आहेत. 'राग रत्नाकर' त्यापैकी एक आहे. या शिवाय हजारी प्रसाद द्विवेदी, आज्ञेय, सुमित्रानंदन पंत, मैथिली शरण गुप्त, हरिवंश राय बच्चन, रामधारी सिंग दिनकर, धर्मवीर भारती, नीरज, आदी मान्यवर कवींची दुर्मिळ पुस्तके आहेत. हा मौल्यवान ठेवा अंबाजोगाई नगरपालिका वाचनालयामार्फत वाचकांना उपलब्ध झाला आहे.
मुकुंदराज कविता ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्थानिक मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष अमर हबीब यांनी प्राचार्य सदाविजय आर्य यांचे आभार मानले व लोकांनी आपल्याकडील कविता ग्रंथ भेट द्यावेत, असे आवाहन केले.
===Photopath===
160421\avinash mudegaonkar_img-20210416-wa0009_14.jpg
===Caption===
सदाविजय आर्य