दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:54 PM2022-10-04T15:54:26+5:302022-10-04T15:54:49+5:30

अंबाजोगाई शहरातील ज्ञानप्रबोधिनीच्या आंबेडकर चौकातील केंद्रावर हार विक्री सुरू

Don't give alms on Dussehra, buy garlands; A self-respecting attitude of girls on the slums of Ambajogai | दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा

दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : वस्तीवर, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलां-मुलींनी भिक्षा न मागता स्वकष्टातून उदरनिर्वाहाचा नवीन मार्ग जोपासला आहे. दसऱ्यानिमित्त फुलांचे हार तयार करून विक्री सुरू आहे. समाजानेच त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्याकडून पुष्पहार खरेदी करण्याचे आवाहन ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे यांनी केले आहे.

अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक, व विविध ठिकाणी झोपडपट्टी व वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलां-मुलींसाठी ज्ञानप्रबोधिनी चे समन्वयक प्रसाद चिक्षे,त्यांचे सर्व सहकारी या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवितात. दसऱ्याच्या निमित्ताने या मुलांना स्वकष्टातून रोजगार उपलब्ध होऊन त्यांचाही सण गोड व्हावा.या उद्देशाने झेंडूच्या फुलांचे सुंदर व आकर्षक हार या  मुलांनी तयार केले आहेत. या हरांची विक्री व नोंदणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील "गोविंद" या ज्ञानप्रबोधिनी च्या केंद्रावर सुरू आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी  दसऱ्यासाठी लागणारे हार खरेदी करावेत.असे आवाहन प्रसाद चिक्षे यांनी केले आहे.

नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते झाले उदघाटन
ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाईच्या या  उपक्रमाचे उदघाटन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोरजी मुंदडा यांच्या हस्ते अविनाश मुडेगावकर यांना झेंडूच्या फुलांचे हार देऊन झाले. ज्ञान प्रबोधिनी ही उदात्त विचार घेऊन काम करणारी संघटना आहे. आपण जे हाराचे मूल्य द्याल ते वस्तीवरील मुलांच्या आणि महिलांच्या कल्याणासाठी वापरले जाईल. यासाठी हार खरेदी करून सहकार्य करावे, असे आवाहन नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.

Web Title: Don't give alms on Dussehra, buy garlands; A self-respecting attitude of girls on the slums of Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.