मुभा असली म्हणून विनाकारण बाहेर फिरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:30+5:302021-04-16T04:34:30+5:30
बीड : राज्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संचारबंदी राज्य सरकारच्या वतीने घोषित करण्यात आली ...
बीड : राज्यातील तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संचारबंदी राज्य सरकारच्या वतीने घोषित करण्यात आली आहे. दरम्यान जीवनावश्यक कामांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी केले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीने कडक संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात सर्वांनी नियमांचे पालन करावे, जेणेकरून साखळी तोडण्यात आल्याला यश मिळेल व पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. शासनाने संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. त्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी याचा गैरवापर करु नये. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र या संकटाला तोंड देण्याची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच निममित मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, वारंवार हात धुवावेत, तसेच सॅनिटाझरचा वापर करावा, याचसोबत विनाकारण बाहेर फिरू नये अन्यथा प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी केले आहे.
लसीकरण करून घ्यावे
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, प्रवासादरम्यान अत्यावश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत. सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. मागील वर्षी प्रमाणे दीर्घ लॉकडाऊनची गरज भासणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घ्यावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.