हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:02+5:302021-07-21T04:23:02+5:30

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला ...

Don’t pamper the tongue as the hotel opens; It's raining, take care of your stomach! | हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

Next

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला आहे. यातच लॉकडाऊनचे निर्बंध सैल झाल्याने लहान-मोठी हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्याचबरोबर रस्त्यांवर हातगाड्यांवर भजी, वडापाव, मिसळ, दाबेली, पोहे आदी अल्पाेपाहाराची दुकाने सुरू आहेत. गरमागरम भजे, पकोडे, वडा, मिसळभाजीचा खमंग सुगंध येताच मनाला आवर घालता येत नाही. मात्र पावसाळ्याच्या दिवसात आजार टाळण्यासाठी जिभेचे लाड कमीच असायला हवेत. त्याचबरोबर अनियंत्रित खाण्यावर मर्यादा घालण्याची गरज आहे. अति तेलकट, शिळे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. परिणामी पोटांचे आजार वाढतात. पावसाळी हंगामात पचनक्रिया मंदावते व प्रतिकारशक्ती कमकुवत होते ती वाढविण्यासाठी आवश्यक तोच चांगला व शुद्ध आहार घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात हे खायला हवे

धान्याच्या विशेषत: साळीच्या लाह्या, दगडी पोहे, मुगाचे वरण मोड आलेली कडधान्ये, भाज्यांचे सूप,

आहारात गुळाचा वापरही महत्वाचा आहे. पचनास हलके व्यवस्थित शिजलेले ताजे गरम पदार्थ असलेला आहार महत्त्वाचा ठरेल.

गरम मसाला, हिंग, सुंठ, मिरी, जिरे, ओवा, लसणाचा वापर आहारात जास्त करण्याची गरज आहे.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

शेतातून थेट बाजारात आलेल्या पालेभाज्यांमध्ये माती, चिखल लागलेला असतो. त्यामुळे कच्च्या पालेभाज्या खाऊ नये. कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नये.

पचनास अवघड असणारे पदार्थ खायचे टाळावे. जंक फूड, फास्टफूड, दही, थंड पदार्थ खाऊ नये.

उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न, टाळावे. तळलेल्या पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करावे.

दूषित अथवा सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिण्याचे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. जंतुसंसर्ग, ताप, अतिसाराची लागण होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ वातावरण संतुलित होईपर्यंत न खाल्लेले चांगले. स्वच्छ पाणी उकळून पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनाला हलक्या असणाऱ्या पदार्थांचे सेवन महत्त्वाचे ठरते.

उघड्यावरचे पदार्थ खाणे धोक्याचे

पावसाळा कालावधीत पचनक्रिया मंद असते. मात्र भूक वाढते. त्यामुळे आहाराच्या बाबतीत संयम राखावा. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. असे पदार्थ टायफाईड, डायरियासारख्या विविध आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकतात. शरीराला पोषक असलेले हलके पदार्थ खाणे उत्तम ठरेल. - डॉ. नीलेश जगदाळे, बीड.

Web Title: Don’t pamper the tongue as the hotel opens; It's raining, take care of your stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.