शिक्षकाची नोकरी नको रे बाबा ; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:01+5:302021-09-12T04:38:01+5:30

बीड : ज्ञानदान सारख्या पवित्र क्षेत्रात जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या शेकडाे तरूणांच्या आशेवर मागील दहा वर्षात पाणी फेरल्याचे दिसत आहे. ...

Don't want a teacher's job, Dad; Lessons for students at DAD! | शिक्षकाची नोकरी नको रे बाबा ; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा ; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

Next

बीड : ज्ञानदान सारख्या पवित्र क्षेत्रात जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या शेकडाे तरूणांच्या आशेवर मागील दहा वर्षात पाणी फेरल्याचे दिसत आहे. जवळपास एक तप पूर्ण होत आला तरी शिक्षक भरती प्रक्रिया नसल्याने डीएड , बीएडचे शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रा ऐवजी दुसरीकडे रोजगार शोधण्याची वेळ या तरूण पिढीवर आली असून उमेदीचे वर्ष निघून जात असल्याने नैराश्यही वाढत आहे. या परिस्थितीमुळे शिक्षकांची भरती न झाल्याने नोकऱ्या मिळतील की नाही याची खात्री नाही आणि आशाही नसल्याने डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बीड जिल्ह्यातही दिसून येत आहे. जिल्ह्यात डीएड व बीएड शिक्षण घेऊन भरतीची प्रतीक्षा करणाऱ्यांची संख्या ४० ते ४५ हजारांच्या आसपास आहे. ही परिस्थिती लक्षात घेता डीएड शिक्षणाबद्दलचे आकर्षण नव्या पिढीपुढे राहिलेले नाही. मागील काही वर्षात बारावी उत्तीर्ण मुलांचा मेडिकल, इंजिनिअरिंगकडे जाण्याचा कल वाढलेला दिसत आहे.

१) जिल्ह्यातील डीएड कॉलेज - २५

एकूण जागा - २०००

आलेले अर्ज - ६५०

प्रवेश निश्चित - ६००

२) नोकरीची हमी नाही !

२०१०-११ नंतर शिक्षक भरती झालेली नाही. शिक्षण घेऊन नोकरीसाठी आठ- दहा वर्षांपासून वाट पाहण्याची वेळ आलेली आहे. नोकरीची हमी नसल्याने नवीन मुले या क्षेत्राकडे येण्यास इच्छुक दिसत नाही. पूर्वी डीएड कॉलेज पूर्ण क्षमतेने भरायची मात्र २०१४-१५ नंतर घरघर लागली आहे. शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नसेल तर डीएड. बीएड. करायचे कशाला? अशी मानसिकता वाढली आहे.

----------

३) इतर अभ्यासक्रमांना घेतला प्रवेश

घरची नाजूक परिस्थिती असल्याने मला डीएड शिक्षण घ्यायचे होते. मात्र २०१० पासून भरतीच नसल्याने उपयोग काय ? म्हणून मी डीएडला जाण्याचे टाळले. मागील काही वर्षांपासून मी एमपीएससी, जिल्हा निवड समित्यांच्या विविध पदांच्या परीक्षा देत असून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - किशोर चव्हाण, बीड.

-----------

माझे २००७ मध्ये डीएड झाले. २०१७ पासून शासनाचे नेमके धोरण समजलेले नाही. होते तेवढ्या भांडवलावर जनरल स्टोअर्स चालविले. दिव्यांग असल्याने शिक्षण क्षेत्रात जाणे सुलभ वाटले होते. भरतीच नसल्याने नाईलाजाने आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे. -- बाळासाहेब बहिर, बीड.

-------------

४) प्राचार्य म्हणतात...

दहा वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरतीचा एक लॉट पूर्ण केल्यास आशा पल्लवीत होतील. त्याचबरोबर डीएड शिक्षणाला चांगले दिवस येतील.

-- जयपाल कांबळे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई.

----------------

सध्या शिक्षक भरती नसल्याने प्रशिक्षणार्थ्यांचा ओघ कमी झाला आहे. शासनाने किमान दोन वर्षात एकदा तरी भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डीएड प्रवेशाचा टक्का आणखी कमी होण्याची शक्यता जाणवत आहे.

-- ज्ञानेश्वर सरकुंडे, प्राचार्य, स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालय, बीड.

------

Web Title: Don't want a teacher's job, Dad; Lessons for students at DAD!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.