अंबाजोगाई येथील दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबरपासून होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 07:16 PM2021-09-29T19:16:00+5:302021-09-29T20:27:30+5:30

तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व.प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने हे दुरदर्शन केंद्र अंबाजोगाईत कार्यान्वित झाले होते.

Doordarshan's broadcasting center at Ambajogai will be closed from October 31 | अंबाजोगाई येथील दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबरपासून होणार बंद

अंबाजोगाई येथील दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबरपासून होणार बंद

Next

अंबाजोगाई-:अंबाजोगाई परिसरात पिंपळा धायगुडा येथे असलेले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. दरम्यान, याच ठिकाणी आकशवाणी एफएम केंद्र कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

२५ वर्षांपूर्वी जेव्हा दूरदर्शन कार्यान्वित झाले. तेव्हा अंबाजोगाईत प्रक्षेपण व्यवस्थित होत नव्हते. टिव्ही पाहण्यासाठी अंबाजोगाई व परिसरात घरावर २५ ते ३० फुटाचा अँटिना बसवावा लागत असे. ही गैरसोय दूर करण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व.प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने हे दुरदर्शन केंद्र अंबाजोगाईत कार्यान्वित झाले होते. त्यानंतर अंबाजोगाईसह परिसरातील ७० ते ८० कि. मी.च्या अंतरावर या केंद्रांच्या माध्यमातून प्रक्षेपण होत आहे. 
येथे आजही २० तांत्रिक, तज्ञांचा कर्मचारी वर्ग कार्यान्वित आहे, अशा सुस्थितीत असणारे हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय नवी दिल्ली येथील प्रसारभारती बोर्डने घेतला आहे. यानुसार ३१ ऑक्टोबरपासून हे कार्यालय बंद होणार असल्याचे  पत्र अंबाजोगाई केंद्राचे सहाय्यक अभियंता यांना प्राप्त झाले आहे.
 
याच जागेवर एफएम सुरू करा
अंबाजोगाई येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबर पासून बंद होत आहे. याच जागेवर आहे त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आकाशवाणीचे अंबाजोगाई एफएम केंद्र सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड संतोष लोमटे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Doordarshan's broadcasting center at Ambajogai will be closed from October 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.