"‘आदित्य’मधील वसतिगृह रिकामे, इमारतीसाठी मनधरणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:27+5:302020-12-31T04:32:27+5:30

बीड : कोरोनामुळे आदित्य शिक्षण संस्थेत हलविलेले वसतिगृह बुधवारी रिकामे करण्यात आले आहे. येथील विद्यार्थिनींना पूर्वीच्या ठिकाणी आणण्यात आले ...

The dormitory in Aditya is empty | "‘आदित्य’मधील वसतिगृह रिकामे, इमारतीसाठी मनधरणी सुरूच

"‘आदित्य’मधील वसतिगृह रिकामे, इमारतीसाठी मनधरणी सुरूच

Next

बीड : कोरोनामुळे आदित्य शिक्षण संस्थेत हलविलेले वसतिगृह बुधवारी रिकामे करण्यात आले आहे. येथील विद्यार्थिनींना पूर्वीच्या ठिकाणी आणण्यात आले आहे. रुग्णालयाची इमारत कायम ठेवण्यासाठी अद्याप निर्णय झालेला नसून, संस्थेची मनधरणी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. या प्रकरणात दिवसभर आरोग्य विभागाची धावपळ सुरू होती.

कोरोनामुळे आदित्य शिक्षण संस्थेत जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले होते; परंतु एप्रिल महिन्यापासून येथील वीज बिल थकले आहे. तसेच छेडछाड, तोडफाेड, भांडणे, अस्वच्छता आदी तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत वारंवार कळवूनही उपाययोजना होत नसल्याने येथील प्राचार्यांनी इमारत व वसतिगृह रिकामे करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र दिले होते. त्यानंतर मंगळवारी प्राचार्यांसोबत चर्चाही झाली होती; परंतु निर्णय झाला नव्हता. बुधवारी सकाळपासूनच या संस्थेत अधिग्रहित केलेले वसतिगृह रिकामे करण्यास सुरुवात झाली. येथील सर्व विद्यार्थिनींना पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील वसतिगृहात आणले जात आहे.

दरम्यान, वसतिगृह रिकामे केले असले तरी रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. बुधवारी दुपारपर्यंत यावर कसलाही निर्णय झालेला नव्हता. प्रशासन व आरोग्य विभागाकडून संस्थेच्या प्रशासनाची मनधरणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

.... तर उपाययोजनाच नाहीत

संस्था इमारत रिकामी करा, याच निर्णयावर आडून राहिल्यास येथील ओपीडी व आयपीडी कोठे आणायची याबाबत कसलेच नियोजन प्रशासनाकडे नसल्याचे दिसते. जर असे झाले तर याचा सर्वात जास्त फटका सामान्य रुग्णांना बसणार आहे.

ओपीडी जुन्या इमारतीत आणावी

आदित्यमध्ये असलेली ओपीडी शहरातील जुन्या इमारतीत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील लोक १०० रुपये खर्च करून एवढ्या दूर जातात; परंतु येथे डॉक्टर नसल्याने त्यांना मानसिक त्रास होऊन आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे ओपीडी इकडे आणण्याची मागणी होत आहे.

कोट

वसतिगृह रिकामे करीत आहोत. रुग्णालय इमारतीसाठी अद्याप निर्णय झालेला नाही. बिल भरण्यासह इतर खर्चाच्या निधीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.

डॉ. सूर्यकांत गित्ते

जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

Web Title: The dormitory in Aditya is empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.