कोटा रद्द केल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दुपटीने प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:29+5:302021-01-02T04:27:29+5:30
अंबाजोगाई : अनेक वर्षाचा अन्यायकारक सत्तर-तीस प्रवेशाचा कोटा रद्द केल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दुपटीने ...
अंबाजोगाई : अनेक वर्षाचा अन्यायकारक सत्तर-तीस प्रवेशाचा कोटा रद्द केल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दुपटीने प्रवेश प्रवेश झाले, असे प्रतिपादन मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी केले. मंगळवारी सायंकाळी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी ते बोलत होते .
यावेळी संस्थेचे पदाधिकारी गणपत व्यास, कमलाकर चौसाळकर, प्रा.माणिकराव लोमटे, एस. के. बेलुर्गीकर, प्रा. गोळेगावकर, प्रा .भीमाशंकर शेटे, डॉ. शैलेश वैद्य,
यशोदा राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. आ.सतीश चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थांना शासनाकडून भरघोस निधी आपण मिळऊन देऊ. मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून विविध संस्थेने मुलींचे वसतिगृह सुरू केले पाहिजेत. शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी सोडविण्याचे काम आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले .
सुरुवातीला आ.चव्हाण यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी नितीन बावगे, राजा जाधव, माजी विद्यार्थी संघटनेचे उदय आसरडोहकर, डॉ .आनंद बडगिरे, डॉ .नरेंद्र काळे, प्राचार्य रमण देशपांडे, प्राचार्य आर.डी. जोशी, प्रा .रमेश सोनवळकर,
मुख्याध्यापिका वर्षा चौधरी, अलका साळुंके,
नांदगावकर, प्रा .पंडित कराड, प्रा . गणेश पिंगळे उपस्थित होते.