७० टक्के मीटर निघाले डिफॉल्टी

By Admin | Published: September 30, 2016 01:11 AM2016-09-30T01:11:22+5:302016-09-30T15:30:38+5:30

भालचंद्र येडवे , लातूर लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ त्

Doublotta 70% Meters | ७० टक्के मीटर निघाले डिफॉल्टी

७० टक्के मीटर निघाले डिफॉल्टी

googlenewsNext


भालचंद्र येडवे , लातूर
लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ त्यामुळे महावितरणने आत्तापर्यंत ११६८९ मीटर ग्राहकांना बदलून दिले आहेत़ आलेल्या तक्रारीनुसार अन्य मीटरची तपासणी सुरू आहे़
लातूर परिमंडळाअंतर्गत जिल्ह्यात सुमारे साडेचार लाखांच्या आसपास वीज ग्राहकांची संख्या आहे. महावितरण कंपनीकडून पूर्वीचे जुने मीटर बदलून नव्याने इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र मीटर फॉल्टीमुळे बील अव्वाच्या सव्वा येवू लागले़ परिणामी, महावितरण कार्यालयात अनेक ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत़ या तक्रारीनुसार जुलै महिन्यात ६३, आॅगस्ट महिन्यात ७३, सप्टेंबर महिन्यात १०९, आॅक्टोबर महिन्यात ७९, नोव्हेंबर महिन्यात १०३, डिसेंबर २१६, जानेवारीत १५८, फेब्रुवारी १५९, मार्च १४५ आणि त्यानंतर महिन्याला सरासरी शंभर ते दीडशे मीटरची टेस्टींग करण्यात आली़ असता त्यातील ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़
सद्याही बील जास्त येत असल्याने तक्रारींचा ओघ ग्राहकांकडून सुरूच आहे़ त्यामुळे महावितरणने आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मीटरची टेस्टींग सुरू केली आहे़ टेस्टींगमध्येही ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ टेस्टिंग झालेल्या आणि डिफॉल्टी निघालेले मीटर बदलून देण्याची कार्यवाही महावितरणने सुरू केली आहे़ काही मीटर बदलूनही दिले आहेत़
जुलै २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत टेस्टींग झालेले ७० टक्के मीटर फॉल्टी निघाले आहेत़ या दरम्यान, अडीच हजाराच्या आसपास तक्रारी होत्या़ त्यानुसार महावितरणने मीटरची टेस्टींग केली असून, ११६८९ मीटर आतापर्यंत बदलून दिले आहेत़ सध्याही महावितरणकडे हजारो तक्रारी आहेत़ या तक्रारीनुसार मीटरची टेस्टींग सुरू आहे़ ज्या मीटरमध्ये फॉल्ट आहे ते मीटर बदलून दिले जात असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन सांगळे यांनी सांगितले़ महिन्याकाठी सरासरी १६० मीटर टेस्टिंगला येतात. पैकी ७० टक्के मीटर टेस्टिंग केल्याअंती डिफॉल्ट निघाल्याचे आढळून आले़ जुलै व आॅगस्ट महिन्यात चुकीच्या बिलासंदर्भात ५०, वीज मीटर मिळत नाही म्हणून ३० रजिस्टर तक्रारी आल्या असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले़

Web Title: Doublotta 70% Meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.