‘डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव कृतीत आणावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:03+5:302021-01-16T04:38:03+5:30
बीड : येथील माऊली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालय बीड येथे विद्यार्थी विकास विभागाद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ...
बीड : येथील माऊली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालय बीड येथे विद्यार्थी विकास विभागाद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ नामविस्तार दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता शेटे, विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी सहा. प्रा. डॉ. सुनंदा आहेर यांची विचारमंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. सविता शेटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिमा अभिवादन कार्यक्रमानंतर सामूहिकरीत्या विद्यापीठ गीत गायन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी सहा. प्रा. डॉ. सुनंदा आहेर यांनी केले. यामध्ये विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पार्श्वभूमी सांगितली.
भूगोल विभागाद्वारा तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला. प्राचार्य डॉ. सविता शेटे यांच्या हस्ते कुंडीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन आणि आभार विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी डॉ. सुनंदा आहेर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठ नामांतर चळवळीच्या लढ्यावर मार्गदर्शन
कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य शेटे यांनी, विद्यापीठ नामांतर चळवळीचा लढा यावर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला भारतीय संविधान हा ग्रंथ एकमेवाद्वितीय असा आहे. महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन याविषयी माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काम केले ते अतुलनीय असे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून कृतीत आणणे या भूमिकेतून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले.