डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:47+5:302021-08-15T04:34:47+5:30
बीड : स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशवराव बळीराम ...
बीड : स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर समर्पित विवेक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना सहकार्यवाह प्रा चंद्रकात मुळे यांनी सांगितले की, परकियांच्या व राष्ट्रद्रोही विचारांच्या गुलामगिरीतून प्रत्येक भारतीयाने मुक्त होण्यासाठी डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
सर्वांनी एकजुटीने देशहितासाठी कार्य करावे या हेतूने देशप्रेमाचे, अखंड भारताचे प्रबोधन त्यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा हा प्रत्येकाने जपला पाहिजे. तसेच अखंड भारत व समृद्धशाली भारत होण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन केले. यावेळी विषय मांडणी उमेश जगताप यांनी केली. प्रत्येकाने अखंड भारताचे स्वप्न पाहिले पाहिजे व ते सत्यात येण्यासाठी त्याला कृतीचीही जोड दिली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक विठ्ठल काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, डॉ. हेडगेवार आणि स्व. दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमांचे पूजन करून विवेक या अंकाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्था सहकार्यवाह प्रा चंद्रकात मुळे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष गजाननराव जगताप, प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष प्रा. सतीश कुलकर्णी, मुख्याध्यापक संजय विभुते व सुरेश अन्नदाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी डावखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजाता चिंचपूरकर यांनी केले. वैयक्तिक पद्य सुलक्षणा खणके यांनी सादर केले.
140821\14_2_bed_16_14082021_14.jpg
बीड स्वा.सावरकर विद्यालयातील कार्यक्रमातील मान्यवर