सूर्यकांत गित्तेंना बीडच्या सीएसपदावरून काढले, सुरेश साबळेंकडे पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:16 IST2021-06-10T18:12:29+5:302021-06-10T18:16:11+5:30
Dr. Suryakant Gitte removed from Beed's CS post : आरोग्य संचालिका साधना तायडे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

सूर्यकांत गित्तेंना बीडच्या सीएसपदावरून काढले, सुरेश साबळेंकडे पदभार
- सोमनाथ खताळ
बीड : प्रशासनातील ढिसाळ कारभार आणि आरोग्य सेवेतील वाढत्या तक्रारी पाहून जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून डॉ.सूर्यकांत गित्ते यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांची नियूक्ती करण्यात आली आहे. आरोग्य संचालिका साधना तायडे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
डॉ.गित्ते यांच्या कारभाराबद्दल सुरूवातीपासून तक्रारी होत्या. कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी रूग्णसेवेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. तसेच फिजिशियन असतानाही कधीच एकाही रूग्णालयात हात लावून तपासले नाही. यासह कर्मचारी, डॉक्टर यांच्याकडून तक्रारी वाढल्या होत्या. याच तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने त्यांना सीएस पदावरून काढून टाकत लोखंडी सावरगावला बदली केली आहे. आता यापुढे सीएसचा अतिरिक्त पदभार माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश साबळे हे पाहणार आहेत. या अचानक झालेल्या बदल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.