दुष्काळप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दिवसभर मॅरेथॉन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:51 PM2019-05-08T23:51:42+5:302019-05-08T23:53:43+5:30

कुठल्याही परिस्थितीत पाणीटंचाईची अथवा काम मिळत नसल्याची तक्रार येऊ नये,असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाभरातील महसूल अधिका-यांना दिले.

The drafts of the district collector took the marathon meeting throughout the day | दुष्काळप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दिवसभर मॅरेथॉन बैठक

दुष्काळप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दिवसभर मॅरेथॉन बैठक

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना सूचना : पाणी, हाताला काम आणि चा-यासाठी सज्ज राहा

बीड : कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला पाणी, मागणीनुसार मजुरांच्या हाताला काम आणि जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागातील सर्व अधिका-यांनी सज्ज रहावे. कुठल्याही परिस्थितीत पाणीटंचाईची अथवा काम मिळत नसल्याची तक्रार येऊ नये,असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाभरातील महसूल अधिका-यांना दिले.
जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी बुधवारी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात जवळपास आठ तास मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती होती. ज्या टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे, त्या पाण्याच्या शुद्धतेची खात्री करा, जवळचे उद्भव शोधा, टँकरच्या फे-या, जिपीएस प्रणाली यासाठी सातत्याने तपासण्या करा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. नरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुहिक लाभाची जास्तीत जास्त कामे उपलब्ध करुन द्या. जिथे कुठे कामाची मागणी होईल त्या ठिकाणी काम उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अधिकाºयांना दिले आहेत.
पालिका मुख्याधिका-यांचा पदभार काढला
बैठकीत बीड नगर पालिकेच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. बीड पालिकेने सातत्याने सांगूनही पाणीपुरवठा योजनेतील उपसा करणारे दोन पंप दुरुस्त करून घेतले नाहीत.परिणामी बीड पालिकेच्या फिल्टर प्लॅन्टवरुन ग्रामीण भागासाठी टँकर भरणे शक्य होत नसल्याचे समोर आले.
उखांडा येथील तलावात शुद्ध पाणी शिल्लक नाही. अशा परिस्थितीत गेवराईच्या धर्तीवर बीड नगरपालिकेच्या फिल्टर प्लॅन्टवरून ग्रामीण भागासाठी टँकर भरणे प्रस्तावित होते.
मात्र, पाणी उपसा करणारे दोन पंप नादुरुस्त असल्याने पुरेशा प्रमाणात पाणीच उचलले जात नसल्याचे समोर आले.
बीड शहरातील स्वच्छता, प्लास्टिक बंदीसंदर्भात झालेले दुर्लक्ष आणि इतर तक्रारीच्या पार्श्वभूमिवर नगर पालिकेच्या कामकाजावर जिल्हाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली.
बीड पालिकेच्या मुख्याधिका-यांचा पदभार काढून ही जबाबदारी गेवराई नगर पालिकेचे मुख्याधिकारी भगत बिगोत यांच्याकडे देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
सध्या बीड पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरीक्त कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सावंत यांच्याकडे होता.

Web Title: The drafts of the district collector took the marathon meeting throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.