डोंगर वेस भागात नालीचे पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:38+5:302021-05-29T04:25:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : शहरातील डोंगर वेस भागात नालीचे पाणी रस्त्यावर आले आहे. या पाण्याचा रहदारीस अडथळा होत ...

Drainage water on the road in the mountain pass area | डोंगर वेस भागात नालीचे पाणी रस्त्यावर

डोंगर वेस भागात नालीचे पाणी रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : शहरातील डोंगर वेस भागात नालीचे पाणी रस्त्यावर आले आहे. या पाण्याचा रहदारीस अडथळा होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.

डोंगर वेस भागात नागरिकांची व वाहनांची रहदारी मोठी असते. येथे ढापे पडल्याने नाली बुजली गेली आहे. यामुळे नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचा रहदारीस अडथळा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रार करूनही याकडे नगर परिषदचे लक्ष नाही. तरी नगर परिषदेने तातडीने लक्ष देऊन नालीची दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.

===Photopath===

280521\img_20210528_142348_14.jpg

===Caption===

धारुर शहरातील डोंगरवेस परिसरात नाली तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर आले आहे. या पाण्यातून वाट शोधताना पादचारी.

Web Title: Drainage water on the road in the mountain pass area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.