सिरसाळा बसस्थानकाचे स्वप्न पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:48+5:302021-07-10T04:23:48+5:30
सिरसाळा : गेल्या अनेक वर्षांपासून सिरसाळा बसस्थानकाविना आहे. परळी रोडवरून बस धावत असल्याने व बसथांबा किंवा बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना ...
सिरसाळा : गेल्या अनेक वर्षांपासून सिरसाळा बसस्थानकाविना आहे. परळी रोडवरून बस धावत असल्याने व बसथांबा किंवा बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना खूप कसरत करून बस पकडावी लागत असे. ऊन्हपावसात चौकात उभे राहून बसची वाट बघत थांबावे लागत होते. सिरसाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राम किरवले यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा केला आणि त्यामुळे जागेची पाहणी झाली.
या पाठपुराव्याची दखल घेत ८ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे विभागीय अभियंता अनिल माने, वाहतूक अधिकारी कराड यांनी सिरसाळा येथील गावाच्या मध्यस्थानी असलेली जागा सरपंच प्रतिनिधी राम किरवले यांच्या म्हणण्यानुसार बघितली. बीएसएनएल टाॅवरसमोरील मोकळ्या जागेतील गोडाउन जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच शासनाकडे पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी राम किरवले, उपसरपंच इम्रान पठाण, असेफ पठाण, सलमान पठाण, आदी उपस्थित होते.
बसस्थानकापासून वंचित असलेल्या या गावाची आता दयनीय अवस्था दूर होण्याची शक्यता दिसत आहे. सिरसाळा बसस्थानकाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होताना दिसत आहे. सिरसाळ्याच्या इतिहासात कोणत्याच सरपंचांना जे जमल नाही, ते अवघ्या दीड वर्षाच्या काळात किरवले यांनी करून दाखवले आहे. त्यांच्या काळात विविध विकासकामे मार्गी लागल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.
090721\09_2_bed_18_09072021_14.jpeg
सिरसाळा