पीपीई कीटसारखे कपडे घालून तो सोशल मीडियावर फिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:34 AM2021-05-27T04:34:43+5:302021-05-27T04:34:43+5:30

परळी : पीपीई कीट घालून शहरात मंगळवारी फिरणाऱ्या एका भोळसर व्यक्तीस पाहून नागरिकांत भीती पसरली होती. सोशल मीडियावर फिरलेल्या ...

Dressed like a PPE insect, he took to social media | पीपीई कीटसारखे कपडे घालून तो सोशल मीडियावर फिरला

पीपीई कीटसारखे कपडे घालून तो सोशल मीडियावर फिरला

Next

परळी : पीपीई कीट घालून शहरात मंगळवारी फिरणाऱ्या एका भोळसर व्यक्तीस पाहून नागरिकांत भीती पसरली होती. सोशल मीडियावर फिरलेल्या या व्यक्तीचा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी शोध घेतला. त्याच्या अंगावरील पीपीई कीटसारखे कपडे उतरविले व त्यास पँट व शर्ट घालण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र, जर ते पीपीई कीट नव्हते, तर त्याच्या अंगावरील कपडे काढून मळकट कपडे परिधान का केले? अशी चर्चा रंगत आहे.

तर सुरक्षितता म्हणून कोरोना काळात वापरण्यात येत असलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क, रस्त्याच्या कडेला टाकण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला असून नागरिक धास्तावले आहेत.

मंगळवारी पीपीई कीट घालून एक भोळसर व्यक्ती शहरात फिरल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत राहिली. त्यानंतर जागे झालेल्या नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. मात्र बुधवारी सकाळी नेहरू चौकात ती व्यक्ती एका झाडाखाली बसलेली आढळली. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यास उठविले व अंगावरील कीट काढण्यास भाग पाडले. तसेच जुनी जीन्स पॅन्ट व शर्ट त्यास घालण्यास दिले.

यासंदर्भात परळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणारे उच्च दर्जाचे पीपीई कीट रस्त्यावर आढळून येत नाहीत. मंगळवारी शहरात एका व्यक्तीने घातलेला कीट हा शेतात फवारणीवेळी वापरण्यात येणारा असावा. शोध घेऊन त्या भोळसर व्यक्तीस दुसरा ड्रेस घालण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले व त्याच्या अंगावरील पांढरा कीट काढून घेण्यात आला. शहरात फिरणाऱ्या या व्यक्तीचे नाव माहीत नाही, असेही न.प.च्यावतीने सांगण्यात आले. पीपीई कीटसारखे दिसणारे कपडे भोळसर व्यक्तीने काठून आणले? कोठे घातले? याचा शोध मात्र संबंधित यंत्रणेस घ्यावा लागणार आहे. तसेच दुसरीकडे या व्यक्तीने घातलेले कपडे पीपीई कीट नव्हते, तर ते काढून दुसरे कपडे का परिधान करायला लावले? असा सवाल केला जात आहे.

===Photopath===

260521\img-20210526-wa0486_14.jpg~260521\screenshot_2021-05-26-14-45-20-20_14.jpg

===Caption===

परळीत पांढरे कपडे घातलेला हा व्यक्ती सोल मीडियावर फिरल्यानंतर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यच्या विल्हेवाटीचा प्रश्न् चर्चेत आला. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी संशय वाटणारे हे कपडे उतरवून  जुने कपडे त्यास परिधान केल्यानंतर या चर्चेला विराम मिळाला.

Web Title: Dressed like a PPE insect, he took to social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.