गाडी जपून चालवा; जिवघेणी ३० ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:04+5:302021-02-26T04:47:04+5:30

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने ...

Drive carefully; 30 life threatening places | गाडी जपून चालवा; जिवघेणी ३० ठिकाणे

गाडी जपून चालवा; जिवघेणी ३० ठिकाणे

Next

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने शोधून काढले आहेत. दरम्यान, याठिकाणी काय-काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अनेकवेळा अपघात झालेले व अपघातात मृत्यूचे वाढलेले प्रमाण अशा रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट जिल्हा वाहतूक शाखा व रस्ते वाहतूक सुरक्षा समितीने शोधले आहेत. त्याठिकाणी अपघात का होतात, त्याची कारणे व ते होऊ नयेत यासाठी उपाययोजना याचा अहवाल तयार केला आहे. तो अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उपययोजना करणे गरजेचे असल्याचे सुचविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट, मंजेरी फाटा, रांजणी फाटा, गेवराई शहरात प्रवेश करताना, बाग पिंपळगाव, रानमळा शिवार गेवराई, तळेवाडी फाटा, मादळमोही रोड- सावरगाव, कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील साठेवाडी फाटा, शिरसदेवी, डोईठाणा शिवार, माळेवाडी फाटा, अंभोरा पोलीस हद्दीतील साबलखेड, आष्टी तालुक्यातील धामणगाव शिवार-पोकरी फाटा, अंबाजोगाई टी-पॉईंट, माजलगाव गॅस गोदामासमोर आणि धारूर घाट यासह इतर असे प्रमुख ब्लॅक स्पॉट असून, याठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच या अपघातात मागील दोन वर्षात जवळपास ६० ते ६५ जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज घेऊन तसेच वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट - ३०

२०२० मध्ये याठिकाणी झालेले अपघात ६७

अपघाताली मृत्यूची संख्या ६०

मागीलवर्षी अपघातांची संख्या

जानेवारी ६२

फेब्रुवारी ५०

मार्च ४२

एप्रिल ०७

मे २६

जून ४२

जुलै ४७

ऑगस्ट ४७

सप्टेंबर ५४

ऑक्टोबर ५७

नोव्हेंबर ५६

डिसेंबर ६०

याठिकाणी गाडी जपून चालवावी

प्रामुख्याने अपघात होणारी विविध ठिकाणे जिल्हाभरात आहेत. यामध्ये मांजरसुंबा घाट, धारूर घाट, कल्याण-विशाखापट्टणम महामार्ग व इतर ठिकाणी वाहने जपून व नियमांचे पालन करावे, जेणेकरून अपघात होण्यापासून बचाव होईल.

प्रतिक्रिया

रस्ते चांगले असल्यामुळे अनेकवेळा वाहन चालवताना गती वाढू न देता नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच सीटबेल्ट, हेल्मेट वापरावे, मद्य प्राशन करून वाहन चालवणेदेखील जिवावर बेतू शकते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कैलास भारती, सपोनि वाहतूक शाखा प्रमुख, बीड

ही आहेत कारणे

बहुतांश ब्लॅक स्पॉटवर रस्ता बांधकामाच्या चुका असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रत्याकडेला असलेल्या झाडांच्या फाद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, रस्त्याच्या साईडपट्ट्या कंत्राटदारांनी भरलेल्या नाहीत. तसेच ज्या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे त्याठिकाणी ते नाहीत. महामार्गावरील जढ-उतार अचानक असल्यामुळेदेखील अपघात झाले आहेत. यासह इतर कारणे अपघात होण्याची आहेत. त्यामुळे याठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांकडून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Web Title: Drive carefully; 30 life threatening places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.