ड्रोनमुळे उंच फळझाडावर फवारणी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:01+5:302021-09-02T05:12:01+5:30

अंबाजोगाई : आता ड्रोनच्या तंत्रामुळे उंच फळझाडावर व पिकांवर फवारणी करणे शक्य झाले आहे. तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ...

Drone allows spraying on tall fruit trees | ड्रोनमुळे उंच फळझाडावर फवारणी शक्य

ड्रोनमुळे उंच फळझाडावर फवारणी शक्य

Next

अंबाजोगाई : आता ड्रोनच्या तंत्रामुळे उंच फळझाडावर व पिकांवर फवारणी करणे शक्य झाले आहे. तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ड्रोनचे फायदे व विकसित तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.

डिघोळअंबा येथील दीनदयाल शोध संस्थानच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ड्रोनद्वारे पीक फवारणी प्रात्यक्षिक झाले. गरुडा एरोस्पेस या ड्रोन निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी हे प्रात्यक्षिक दाखविले. सोयाबीन व बोर या फळबागेवर कीटकनाशकांची फवारणीही करण्यात आली.

यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सौरभ शर्मा, कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषी निविष्ठा विक्रेते, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक व अंबाजोगाई, केज, परळी तालुक्यातील विविध गावातील प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना ड्रोनसारखे आधुनिक यंत्र कमी खर्चात गावपातळीवर उपलब्ध होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - डॉ. सूर्यवंशी

ड्रोन तंत्रज्ञानातील कमतरता व खर्च यापुढील काळात कमी होऊन तंत्रज्ञान अधिक सक्षमपणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल. भविष्यातील गरज ओळखून कृषि विज्ञान केंद्राने या ड्रोन तंत्रज्ञानावर काम सुरु केले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले.

ड्रोनमुळे वेळेची बचत

पाठीवरच्या पंपाने फवारणीच्या कामासाठी वेळ जास्त लागतो, पाणी व कीटकनाशकांचे ओझेही पाठीवर घ्यावे लागते. अनेकदा फवारणी न झाल्याने पीक उत्पादकतेत घट येते. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, वेळेची बचत, श्रम कमी करणे यासोबतच सुरक्षित फवारणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयोगी असल्याचे कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी सांगितले. या ड्रोनच्या वापरामुळे फळबागेच्या, फुलगळ व फळगळीचा अभ्यास होण्याची गरज आहे. अशी अपेक्षा फळबाग शास्त्रज्ञ नरेंद्र जोशींनी व्यक्त केली.

तासाला ३ एकर फवारणी - कार्तिक राजा

हे यंत्र बॅटरीवर चालणारे असून, याची किंमत ५ लाख रुपये आहे. याद्वारे तासाला ३ एकर क्षेत्रावर फवारणी पूर्ण होते. या यंत्राच्या टाकीची क्षमता, त्यात भरावयाचे औषध याविषयाची माहिती कार्तिक राजा यांनी दिली.

010921\img-20210828-wa0098.jpg

ड्रोन द्वारे पीक फवारणी

Web Title: Drone allows spraying on tall fruit trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.