बीड जिल्ह्यात दरोडेखोर पडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:16 AM2018-01-15T00:16:56+5:302018-01-15T00:17:31+5:30

दोन घरफोड्या करुन तिसºया ठिकाणी हात साफ करण्यासाठी आले. यावेळी घरातील व्यक्ती जागी झाली अन् त्यांच्या मागे लागली. दोघांपैकी एक दरोडेखोर धावताना अंधार असल्यामुळे विहिरीत पडला, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना शिरुर कासार तालुक्यातील पाडळी येथे शनिवारी रात्री एकच्या सुमारास घडली.

A drone in Beed district fell in the well | बीड जिल्ह्यात दरोडेखोर पडला विहिरीत

बीड जिल्ह्यात दरोडेखोर पडला विहिरीत

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामस्थ मागे लागल्याने अंधाराने केला घात

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दोन घरफोड्या करुन तिसºया ठिकाणी हात साफ करण्यासाठी आले. यावेळी घरातील व्यक्ती जागी झाली अन् त्यांच्या मागे लागली. दोघांपैकी एक दरोडेखोर धावताना अंधार असल्यामुळे विहिरीत पडला, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना शिरुर कासार तालुक्यातील पाडळी येथे शनिवारी रात्री एकच्या सुमारास घडली.

राहूल संजय भोसले (२०, रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे विहिरीत पडलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. राहुल हा सहका-यांसोबत पाडळी येथे घरफोड्यासाठी आला होता. दोन ठिकाणी त्यांनी चोºयाही केल्या. तिसºया ठिकाणी ते राधाकिसन कंठाळे यांच्या घरामध्ये गेले. याचवेळी राधाकिसन कंठाळे व त्यांच्या पत्नी हे दोघेही जागेच होते. चोरांनी दरवाजा उघडताच त्यांना लक्षात आले. चोरांनाही घरातील व्यक्ती जागे असल्याचे समजले. आपली पोल खोल होणार या भीतीने दोघांपैकी एका चोराने कंठाळे यांच्यावर गजाने वार केला. मात्र, तेवढाच प्रतिकार करीत कंठाळेने यांनी चोराला लाथ मारली. एवढ्यात त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ जमा झाले.

चोरांनी परिस्थिती पाहून पळ काढणे पसंत केले. परंतु कंठाळे दाम्पत्याने हिंमतीने त्या दोघांवर दगडफेक केली. बचावासाठी पळणाºया दोन चोरांपैकी राहुल भोसले हा अंधारात न दिसल्यामुळे विहिरीत पडला. यावेळी ग्रामस्थ जमा होत असल्याचे पाहून दुसºयाने पळ काढला.
पाडळी ग्रामस्थांनी तात्काळ शिरुर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उप अधीक्षक डॉ. अभिजित पाटील, पो. नि. सुरेश चाटे, पोउपनि एम. आर. काझी यांनी गावात धाव घेतली. पाण्यात पडलेल्या चोराला बाहेर काढून त्याच्यावर शिरुर ठाण्यात गुन्हा नोंदवला.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर स. पो. नि. सचिन पुंडगे यांनी शिरुर ठाण्यात धाव घेत राहुलची ‘कुंडली’ काढली. त्यामध्ये तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले.

सप्ताहात स्पीकरद्वारे चोरीची माहिती
पाडळीत सध्या अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे.गावात चोरी झाल्याची माहिती सप्ताह मंडपात असलेल्या काही लोकांना समजले. त्यांनी तात्काळ माईकवर ताबा मिळवत चोरीची माहिती स्पीकरद्वारे ग्रामस्थांना दिली. पाहतापाहता सारे गाव मंडपाच्या दिशेने जमा झाले. मंडपात आल्यानंतर त्यांना चोर विहिरीत पडल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी त्या दिशेने धाव घेतली. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून विहिरीतील कपारीत लपलेल्या चोरावर कुठलाही हल्ला न करता पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: A drone in Beed district fell in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.