परळीतील ड्रोन नाली रस्त्याचे काम बोगस अन् निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:07+5:302020-12-25T04:27:07+5:30
बीड : परळी शहरातील मर्कज मशिदीसमोरील रोडवर ड्रोन (जमिनीमध्ये पाईप पुरणे) नालीचे काम सुरू आहे. सर्व काम मोजमापानुसार होत ...
बीड : परळी शहरातील मर्कज मशिदीसमोरील रोडवर ड्रोन (जमिनीमध्ये पाईप पुरणे) नालीचे काम सुरू आहे. सर्व काम मोजमापानुसार होत नसून, ड्रोन पाईपला उतार किंवा लेवलसुद्धा नाही. पिण्याच्या पाण्याचे काही कनेक्शन मोडले असून ही त्याची भरपाई करण्यात टाळाटाळ करीत आहेत, याकडे लक्ष देत चौकशी करावी, अशी मागणी उपजिल्हाधिकारी, नगरपालिका, नगरविकासमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
काही महिन्यापासून परळी शहरात ड्रोन नाली व सिमेंट रोडचे काम होत आहे. हे काम श्रीनाथ इंजिनिअरिंग, लातूर ही कंपनी व अन्य काही कंत्राटदार ड्रोन नालीचे काम करुन सिमेंट रस्त्याचे कामे करीत आहेत. परंतु, रस्त्याचे काम निकृष्ट व बोगस होत आहे. कामाची पाहणी करण्यासाठी ना अभियंता ना कोणता अधिकारी येत नाही. १० ते १५ दिवसानंतर रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडत आहेत. असेच काम बरकत नगरमध्ये करण्यात आले. सिमेंटही इस्टीमेटप्रमाणे टाकण्यात आलेली नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
सर्व कामांची चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने नगर परिषद परळीसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार समितीचे मराठवाडा उपाध्यक्ष शेख अजीम व शेख बद्रोद्दीन यांनी दिला आहे.