नवीन वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:50+5:302021-06-09T04:41:50+5:30
..... चोरट्यांचा धुमाकूळ,नागरिक त्रस्त अंबाजोगाई : शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या ...
.....
चोरट्यांचा धुमाकूळ,नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत या परिसरात पोलिसांची गस्त सुरू राहिली तर चोरीच्या घटनांना आळा बसेल. यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
....
ग्राहक सेवा केंद्रांकडून ग्राहकांची लूट
अंबाजोगाई : शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रांमधून सर्वसामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. ग्राहक सेवा केंद्राकडे बँक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. या संदर्भात बँकांनी दक्षता बाळगावी व ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी रिपाइंच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.
....
आधारलिंक बंधनकारक
अंबाजोगाई : स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने सर्व नगरपरिषद तसेच नगरपंचायतींना शासनाकडून आधार फिडिंगचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक अर्जदाराच्या अर्जासोबत आधार लिंकिंग करण्यात आले आहे. शासनाने ही अट घातल्याने आधार लिंकिंगसाठी आधार केंद्राची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.