दुष्काळी शिरूर तालुक्यात उसाच्या गु-हाळाचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:00 AM2019-01-03T00:00:14+5:302019-01-03T00:00:46+5:30

तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली. पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत असताना उभ्या ऊसाला जगवायचे कसे असा प्रश्न तर उस तोडीसाठी कारखान्यांच्या मगजमारीला पर्याय म्हणून सुरु झालेले गु-हाळ हा पर्याय निवडला जात गूळ तयार केला जात आहे.

In the drought-like Shirur taluka, the sweetness of the sugarcane slurry | दुष्काळी शिरूर तालुक्यात उसाच्या गु-हाळाचा गोडवा

दुष्काळी शिरूर तालुक्यात उसाच्या गु-हाळाचा गोडवा

Next

कारखान्याला शोधला पर्याय : पाण्याअभावी घटला उतारा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाली सोय, कोयत्यापेक्षा शोधली वेगळी वाट
विजयकुमार गाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली. पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत असताना उभ्या ऊसाला जगवायचे कसे असा प्रश्न तर उस तोडीसाठी कारखान्यांच्या मगजमारीला पर्याय म्हणून सुरु झालेले गु-हाळ हा पर्याय निवडला जात गूळ तयार केला जात आहे.
तालुक्यातील तागडगाव येथील रहिवासी रमेश साहेबराव ढोले यांनी बीड - पाथर्डी रोडवरील मामाच्या शेतात गुºहाळाची उभारणी केली. चुलांगण बांधणीनंतर क्रेशर बसवले. साधारण एक महिण्यापासून शेतकºयांचा उस आधन तत्त्वावर गाळून गूळ तयार करण्याचे काम सुरू केले. हातात कोयता घेऊन दुसºयाचा उस तोडण्याऐवजी घरातील बारा माणसे याच कामात समाविष्ट करून शेतकºयांची सोय व रोजगार उभा केला. रोज किमान दोन आधन उतरले जात आहे. एका आधनाला दोन ते अडीच हजार रुपये आकारले जातात.
शेतकºयाने उस आणायचा आणि गूळ घेऊन जायचा असा दिनक्रम असल्याने अडलेल्या शेतकºयांची कारखान्याच्या दारात हेलपाटे घालण्यापासून सुटका झाल्याचे दिसून येत आहे.
एका महिन्यात साठ ते सत्तर आधन उतरले. मात्र, उसाला पाणीच नसल्याने रस कमी निघत असून, किमान ७७ टक्के घट सोसावी लागत आहे. एका आधनाला २४ ते २५ गुळाच्या ढेपा प्रती दहा किलो वजनाच्या तयार होतात. सध्या परवडण्याचा हिशेब न पाहता उस बाहेर निघून काही तरी हातात पडते यावर शेतकरी समाधान मानत आहे.
काकवी (पाक) ला चांगली मागणी व भाव देखील त्याबरोबर गूळ सुध्दा जागेवरच विकला जात असल्याचे सांगण्यात आले. काकवी एका बाटलीला ५० रुपये तर १० किलोच्या गुळाच्या ढेपेला ४०० रुपये असा भाव मिळत आहे. एका दिवसाला काकवीची विक्री किमान दोन ते अडीच हजाराची होत असल्याचे महिलांकडून सांगण्यात आले. सध्या थंडीचे दिवस असल्याने चहासाठी गुळालाच पसंती असल्याचे सांगण्यात आले. ऐन दुष्काळात रस्त्यावरचे हे गुºहाळ एक कुतूहलाचा विषय बनला आहे.

Web Title: In the drought-like Shirur taluka, the sweetness of the sugarcane slurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.