बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:17 AM2019-08-27T00:17:48+5:302019-08-27T00:19:02+5:30
शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करू नयेत, शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे तात्काळ वाटप करा यासह विविध मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
अंबाजोगाई : शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करू नयेत, शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे तात्काळ वाटप करा यासह विविध मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळुक, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतक-यांच्या पिकविम्याचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा करू नयेत, शेतक-यांच्या पीकविम्याचे पैसे तात्काळ वाटप करा, पीक कर्जाचे पुनर्गठन करा, कर्जमाफी जाहीर झालेल्या शेतकºयांची यादी जाहीर करा, शेतक-यांना पीककर्ज तात्काळ मंजूर करा, घोषणाबाजीने बँकेचा परिसर दणाणून गेला. बँकेच्या मॅनेजरने यापुढे शेतकºयांची अडवणूक होणार नाही, असे आश्वासन दिले. आंदोलनात तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, अॅड. विशाल घोबाळे, उपतालुका प्रमुख वसंत माने, खंडु पालकर, नाथराव मुंडे, महादेव आरसुडे, गणेश जाधव, शिवकांत कदम यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी होते.
परळीत एसबीआयसमोरही आंदोलन
परळी : तालुक्यातील शेतक-यांना पीक विम्याविषयी बँकाद्वारे होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथील एस.बी.आय. शाखेसमोर सोमवारी ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. दीर्घकाळ दुष्काळी परिस्थितीचा सामना करत शेतकरी हवालदिल झाला असून, अशा स्थितीत सर्वच राष्ट्रीयकृत बँकाद्वारे पीक विमा, पीक कर्ज, पुनर्गठन तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व मुद्रा लोनच्या अंतर्गत कर्ज वाटप अशाविषयी बँकांनी शेतकºयांना व नवउद्योजक तरु णांना वेठीस धरले असून, त्यांच्या या सर्व समस्या सोडवण्यासाठी व बँक अधिकाºयांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी शिवसेने च्या वतीने ढोल बाजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी राजा पांडे, राजेश विभुते, रमेश चौंडे उपस्थित होते.