टपकणारे थेंब, ओलेचिंब अंग, थंड वाऱ्याचा घ्या आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:37 AM2021-09-27T04:37:19+5:302021-09-27T04:37:19+5:30
धारूर : रापमच्या धारूर आगारातील अनेक बसेसला गळती लागली आहे. रविवारी दिवसभराच्या पावसामुळे बसच्या वरील पत्र्यातून पाणी ...
धारूर : रापमच्या धारूर आगारातील अनेक बसेसला गळती लागली आहे. रविवारी दिवसभराच्या पावसामुळे बसच्या वरील पत्र्यातून पाणी टपकत होते. आसने भिजलेली असल्याने उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे टपकणारे थेंब, ओलेचिंब अंग, थंड वाऱ्याचा घ्या आनंद असा अनुभव प्रवाशांना आला. धारूर आगारातील अनेक बसेस जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागतो. रविवारी एमएच २० बी. एल.००६८ क्रमांकाची बस किल्ले धारुर स्थानकातून केजसाठी सोडण्यात आलेली होती. बसमध्ये एकूण पंधरा प्रवासी होते. पण एकही आसन कोरडे नव्हते. संपूर्ण बस गळत होती. त्यामुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला. पावसाचे पाण्याने काही प्रवासीदेखील भिजले. ओले आसन, टपावरून गळणारे थेंब, खालच्या बाजूने उचकटलेला पत्रा अशा अवस्थेत प्रवास करण्याची वेळ आल्याचे या बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी सुधाकर शेळके यांनी सांगितले.
260921\img-20210926-wa0176.jpg
धारूर आगाराचे बसला गळती प्रवाशी हैरान