अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी सातव्या दिवशी कोदरी ग्रामस्थांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:22 AM2018-02-28T00:22:59+5:302018-02-28T00:24:11+5:30
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी अंबाजोगाई जिल्हा कृती समितीने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच होते. मंगळवारी कोदरी ग्रामस्थांनी जिल्ह्यासाठी धरणे धरले. या वेळी कोदरी गावाचे असंख्य ग्रामस्थ सहभागी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी अंबाजोगाई जिल्हा कृती समितीने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच होते. मंगळवारी कोदरी ग्रामस्थांनी जिल्ह्यासाठी धरणे धरले. या वेळी कोदरी गावाचे असंख्य ग्रामस्थ सहभागी होते.
जिल्हा निर्मितीसाठी जिल्हा कृती समितीच्या वतीने जनआंदोलन उभे केले आहे. अंबाजोगाई जिल्हा व्हावा अशी प्रत्येक जनमाणसाची इच्छा आहे. ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी अंबाजोगाईकरांनी वेळोवेळी आंदोलनही केले. परंतू अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी काही पूर्ण होऊ शकली नाही. राज्य सरकार नवीन जिल्हा निर्मितीच्यासाठी सकारात्मक विचार करीत आहे. अंबाजोगाई जिल्ह्याची जुनी मागणी लक्षात घेऊन अंबाजोगाई जिल्हा घोषित करावा, अशी अपेक्षा अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठीच अंबाजोगाईकरांनी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यासाठी जिल्हा कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे.
कोदरी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाचे धोरण छोटे जिल्हे निर्माण करणे बाबतीत झाले असून शहरात जिल्हास्तरावरील सर्व कार्यालये निर्माण झाले आहेत.
तेव्हा सदर मागणीची तीव्रता लक्षात घेता तात्काळ अंबाजोगाई जिल्हा घोषित करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. त्यासोबतच कोदरी ग्रामपंचायतीच्या वतीनेही अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा ठराव घेण्यात आला आहे. या निवेदनावर शोभा कदम, गोकुळ कदम, दत्तात्रय कदम, संजय भालेकर, बालासाहेब सुरवसे, बलभीम पासामे, शेषराव लुंगारे यांच्यासह आदींच्या स्वाक्षºया आहेत. या धरणे आंदोलनात अंबाजोगाई जिल्हा कृती समितीचे सदस्यही सहभागी झाले होते.