पांढऱ्या सोन्याला यंदा दुष्काळाचा गंज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:20 AM2018-09-30T00:20:52+5:302018-09-30T00:22:09+5:30

तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

Due to drought of white gold this year! | पांढऱ्या सोन्याला यंदा दुष्काळाचा गंज !

पांढऱ्या सोन्याला यंदा दुष्काळाचा गंज !

Next
ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील परिस्थिती : २५ गावांत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; कापसाच्या उत्पादनात घट

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील २५ गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे.
गेवराई तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील पेरणीलायक १ लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील गेवराई, रेवकी, तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाचेगाव, मादळमोही, चकलांबा, उमापूर, धोंडराई या दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी कापूस ७४ हजार हेक्टर, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका सह आदी खरीपातील पेरण्या जवळपास ९८ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आल्या होत्या. सुरुवातीलाच पाऊस कमी प्रमाणात पडल्याने तालुक्यातील सर्व पिके ही सलाईनवर होती. कोणत्याही पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक पिकेच वाया गेली असून, अत्यल्प प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, शेतकºयांनी उधार उसनवारी करून केलेला खर्च निघणे सुद्धा कठीण झाले आहे.
गेवराई तालुका कापसाच्या उत्पादनासाठी मराठवाड्यात एक क्रमांकाचा तालुका मानला जातो. तालुक्यातील विविध भागात जवळपास २५ जिनिंग उभ्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मागील वर्षी कापसाच्या उत्पादनात ५० टक्के जवळपास घट झाली होती. यावेळी जवळपास ८० टक्के कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.
गेवराई तालुक्यातील विविध भागात दमदार पाऊसच झाला नसल्यामुळे तालुक्यातील गोविंदवाडी, मादळमोही, जव्हारवाडी, शिंदेवाडी, खडकी, चकलांबा, बंगाली पिंपळा येथील लघुप्रकल्पातील पाणीसाठा शून्य झाला आहे. परतीच्या पावसाने जर मेहरबानी केली तर हे लघुप्रकल्प भरू शकतील.
गेवराई तालुक्यातील दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे तालुक्यात नदी, नाले, भरले नाहीत. त्यामुळे सध्या विहिरी आणि बोअरने तळ गाठला असल्याने तालुक्यातील जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यातच उन्हाळा : पिके करपू लागली
गेवराई तालुक्यातील हलक्या व भारी जमिनीतील कापसाच्या पिकानी माना टाकल्या असून पावसाची नितांत आवश्यकता आहे. गोदावरीच्या व उजव्या कालव्याच्या धोंडराई, तळणेवाडी, राक्षसभुवन, सुरळेगाव, सावळेश्वर, माळस पिंपळगाव, कोल्हेर, लुखामसला, भोजगाव व इतर ठिकाणी उसाचे जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, अनेक दिवसांपासून पाउसच नसल्यामुळे ऊस करपायाला लागले आहेत.
तालुक्यातील शेतकºयांनी परतीचा पाऊस पडल्यावर ज्वारीचे पिके घ्यावीत. कारण यामुळे ज्वारी तर मिळेल; पण जनावरांना चारा देखील उपलब्ध होईल. तसेच तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यात शेतकºयांच्या क्षेत्रीय भेटी सुरु असल्याचे कृषी मंडळ अधिकारी संतोष घसिंग म्हणाले
तालुक्यात एकूण पर्जन्यमान ६७५ पैकी फक्त २७५ मि. मी. झाल्याची नोंद आहे. तालुक्यात भर पावसाळ्यात उन्हाळाच असल्याची परिस्थिती आहे.

Web Title: Due to drought of white gold this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.