अतिवृष्टीने हातची पिके गेली, नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 06:40 PM2021-09-28T18:40:13+5:302021-09-28T18:41:56+5:30
शेतातील पिके तर गेलीच पण अनेक गावातील नदीला पुर आल्याने गावचा संपर्क देखिल तुटला आहे.
गेवराई : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री तालुक्यातील रेवकी, जातेगांव, तलवाडा,पाचेगावं,
सिरसदेवी, मादळमोही या भागात पुन्हा अतिवृष्टी झाली. शेतातील पिके तर गेलीच पण अनेक गावातील नदीला पुर आल्याने गावचा संपर्क देखिल तुटला आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसा पूर्वी तालुक्यातील दहाही मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या हातातोडाशी आलेला घास हिरावून घेतला. तर अनेक गावचा संपर्क देखिल तुटला होता. त्यात पुन्हा भर म्हणजे सोमवार रोजी रात्रभर तालुक्यातील रेवकी, जातेगांव, तलवाडा, पाचेगावं, सिरसदेवी,
मादळमोही या भागात अतिवृष्टी झाल्याने पिके तर गेली. मात्र, राजापुर गावचा संपर्क तुटला आहे. तसेच रेवकी गावात विद्रुपा नदीला पुर आल्याने रेवकी गावातील शाळा, आरोग्य केद्रंसह गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच तालुक्यातील रोहीतळ येथील लेंडी नदीला व अर्धामसला येथील नदीला पाणी आल्याने गावचा तब्बल पाच तास संपर्क तुटला होता. तसेच विविध गावातील नदी, नाले, ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
तालुक्यातील दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. नदी, नाल्यात, ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जाऊ नये व आपला जीव धोक्यात घालु नये असे आवाहन प्रभारी तहसीलदार शामसुंदर रामदासी यांनी सांगितले.