मूलबाळ होत नसल्याने विवाहितेस घराबाहेर हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:19 AM2018-03-15T00:19:29+5:302018-03-15T00:19:29+5:30

मूलबाळ होत नसल्याने विवाहितेस घराबाहे हाकलल्याची घटना बीड तालुक्यातील नेकनूर येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Due to no childhood, leave the marriage abroad out of the house | मूलबाळ होत नसल्याने विवाहितेस घराबाहेर हाकलले

मूलबाळ होत नसल्याने विवाहितेस घराबाहेर हाकलले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मूलबाळ होत नसल्याने विवाहितेस घराबाहे हाकलल्याची घटना बीड तालुक्यातील नेकनूर येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच घराच्या रंगरंगोटीसाठी आणि फरशी बसविण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये घेऊन ये, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला होता. हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्रात गेले होते, परंतु न मिटल्याने अखेर गुन्हा दाखल झाला.

पूजा विनायक सिरसाट (२५ रा.चिंचाळा ता.वडवणी) असे त्या विवाहितेचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर चार वर्षे त्यांनी पूजाला सुखाने नांदविले. परंतु त्यानंतर पूजाला मूलबाळ होत नाही, म्हणून त्रास होऊ लागला. तसेच घराच्या रंगरंगोटीसाठी व फरशी बसविण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी होऊ लागली. पुजाने नकार देताच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. हा त्रास असह्य झाल्याने पूजाने महिला तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. येथे दोघांचेही समुपदेशन करण्यात आले, परंतु हा वाद मिटला नाही. त्यामुळे पूजाच्या फिर्यादीवरून पती विनायक, सासरा सुधाकर, सासू आशाबाई व नणंद मालता तायड यांच्याविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूजा सध्या माहेरी म्हणजेच नेकनूर येथे राहत असून हा गुन्हा नेकनूरमध्ये दाखल झाला आहे.

पाच लाखांसाठी छळ
ट्रक घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत अंजना अरूण शिंदे (२८ रा.मुकुंदवाडी, औरंगाबाद ह.मु.तालखेड ता.माजलगाव) या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती अरूण शिंदे, सासू मालनबाई, आजत सासू मालनबाई नरवडे यांच्यविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Due to no childhood, leave the marriage abroad out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.