मान्सून पूर्व पावसाने माजलगाव धरणाची पाणी पातळी १.३५ टक्क्याने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 06:49 PM2020-06-06T18:49:45+5:302020-06-06T18:53:55+5:30
माजलगाव धरणात 2 जुन रोजी 427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता.
माजलगाव : येथील माजलगाव धरणाची पाणी पातळी पहिल्याच मान्सून पूर्व पावसाने १.३५ टक्याने वाढ झाली होती. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
माजलगाव धरणात 2 जुन रोजी 427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 204.50 दलघमी ऐवढा एकूण पाणीसाठा होता तर 62.00 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व 19.87 टक्के पाणी होते. 6 जुन रोजी धरणात रोजी 427.75 मिटर ऐवढा पाणीसाठा होता. यावेळी धरणात 206.60 दलघमी ऐवढा एकूण पाणीसाठा होता तर 65.00 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणीसाठा होता तर 21.22 टक्के पाणी साठा होता. मान्सून पूर्व पहिल्याच पावसात 1.35 टक्के पाणी पातळी वाढली. या धरणाच्या इतिहासात प्रथमच मान्सून पूर्व पावसामुळे पाणी पातळी वाढली. या वाढलेल्या पाणी पातळीमुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे
सिंचनाच्या क्षेत्रात वाढ
गेल्या वर्षी माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने व पावसाळा संपत आला तरी धरणाची पाणी पातळीत जास्त प्रमाणात वाढ न झाल्यामुळे धरणाची पाणीपातळी जोत्या खालीच राहते की काय ? असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने केवळ चार दिवसात हे धरण टक्केवारीत येऊन पूर्णपणे भरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कालवा व नदी द्वारे अनेक वेळा पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.