माता रमाईंच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब प्रज्ञासूर्य झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:43+5:302021-02-15T04:29:43+5:30
माजलगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना अभ्यासात गुंतलेल्या मनाला अडथळा होणार नाही यासाठी रमाई मातेने सर्व ...
माजलगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना अभ्यासात गुंतलेल्या मनाला अडथळा होणार नाही यासाठी रमाई मातेने सर्व काळजी घेतली. कष्ट करून त्यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावला. या माता रमाईच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब प्रज्ञासूर्य झाले, असे मत लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे यांनी व्यक्त केले.
येथील नवयान बुद्ध विहार माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उजगरे बोलत होते. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते धम्माभाऊ साळवे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे, भगवान ससाने, अश्विन डावरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून सोनाजी घडसे, बाबासाहेब राऊत, वैजनाथ पायके, पांडुरंग शिरसाट यांनी उपस्थिती लावली.
अश्विन डावरे, भगवान ससाने, बाबासाहेब राऊत, सोनाजी घडसे, लखन सहजराव यांनीही माता रमाई यांच्या त्यागाची उपस्थितांना जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सिरसट यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवाजी नवगिरे, कृष्णा सुरवसे, प्रवीण सिरसाट, मुकुंद माने, परमेश्वर एम. सिरसट, परमेश्वर आर. सिरसट, पिंटू थोरात, सुनील खंडागळे, देवराव घोडे, रमेश सिरसट, मधुकर साळवे, सागर सिरसट, अशोक सुरवसे, सचिन घोडे, परमेश्वर नवगिरे, राजेंद्र शिरसट व नवयान बुद्ध विहार सादोळा येथील तरुणांनी परिश्रम घेतले. शेवटी दत्ता जाधव यांनी आभार केले.