दहा व वीसच्या बंडलामुळे बँक खातेदार त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 07:41 PM2018-07-27T19:41:18+5:302018-07-27T19:44:38+5:30

आता तर मोठ्या खातेदारांनाही जुन्या १०,२० व १०० च्या नोटांची बडल बँकेतून देण्यास येत आहेत.

Due to the ten and twenty rupees, the bank account holders suffer | दहा व वीसच्या बंडलामुळे बँक खातेदार त्रस्त 

दहा व वीसच्या बंडलामुळे बँक खातेदार त्रस्त 

Next

गेवराई (बीड) : काही महिन्यांपासून बँकेतून दोन हजारांच्या नोटा गायब होऊन त्याजागी नवीन २०० व ५० च्या नोटा मिळू लागल्या.  आता तर मोठ्या खातेदारांनाही जुन्या १०,२० व १०० च्या नोटांची बडल बँकेतून देण्यास येत आहेत. यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची खातेदारांची ओरड आहे. 

आधीच बँकेच्या संगणकीय आॅनलाईन कार्यप्रणाली, शेतकरी कर्जमाफी, पंतप्रधान मुद्रालोन या योजना प्रकरणी होणाऱ्या त्रासामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे. त्यात लाखो रूपयांचा व्यवहार करणाऱ्या खातेधारकांना बँकेकडून लहान-लहान नोटाची बंडल मिळत असल्यामुळे मिळालेली रक्कम बरोबर आहे की नाही, त्यातील जीर्ण झालेल्या नोटा एवढी मोठी रक्कम सोबत न्यायची कशी? असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येते. नोटा बंदीनंतर बँकेकडून केवळ दोन हजाराच्या नोटा मिळायच्या त्यानंतर ५०० च्या नवीन नोटा चलनात आल्याने बँकेतून दोन हजारांच्या नोटा कमी झाल्या.

आता बँकेतून १०, २०, ५० व १०० च्या जुन्या नोटांची बंडल देण्यात येवू लागल्याने ग्राहक व बँक कर्मचाऱ्यांत वाद निर्माण होऊ लागले आहेत. एटीएम, पेटीएम, पासबुक नोंदीसाठी लागणारी रांग, एटीएममध्ये होणारा ठणठणाट यामुळे आधीच खातेदार त्रस्त आहेत. त्यातच  जुन्या नोटांची डोकेदुखी यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न खातेदारांच्या मनात निर्माण झाले आहेत. बँक प्रशासनाने खातेदारांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. बँकेत पैसे काढण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्यात १० व २० च्या नोटा मिळत असल्याने शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत. 

व्यापाऱ्यांचे सर्वाधिक हाल 
गेवराई ही मोठी व्यावसयिक बाजारपेठ आहे येथे विविध प्रकारचे व्यावसायिक आहेत त्यांना दररोज बँकेतून पैसे काढण्यासाठी जावे लागते परंतु सध्या बँकेतून किरकोळ नोटा वितरीत केल्या जात आहेत. त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत.

Web Title: Due to the ten and twenty rupees, the bank account holders suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.