कोरोनाकाळात धारूरच्या शिक्षकांनी माणुसकी जिवंत ठेवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:48+5:302021-05-23T04:33:48+5:30
: आरोग्य विभागाला दिले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, मल्टीप्यारा मॉनीटर धारूर : कोरोना काळामध्ये शिक्षकांनी निधी जमा करून पाच ऑक्सिजन ...
: आरोग्य विभागाला दिले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, मल्टीप्यारा मॉनीटर
धारूर : कोरोना काळामध्ये शिक्षकांनी निधी जमा करून पाच ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व पाच मल्टीप्यारा मॉनीटर आरोग्य विभागास उपलब्ध करून देवून माणूसकी जिवंत ठेवण्याचे कार्य केल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. धारूर तालुक्यातील शिक्षकांनी कोरोना रूग्णांना मदत व्हावी म्हणून साडेचार लाख रूपयांचा निधी जमा केला. या निधीतून कोविह काळात उपयोगी मशीन आरोग्य विभागाकडे शनिवारी सपूर्द करण्यात आल्या.
या वेळी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी बोलत होते. उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवने, गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश कोकाटे, पोलीस निरीक्षक सुरेखा धस, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चेतन आदमाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले, डॉ. अमोल दुबे यांची प्रमूख उपस्थिती होती. या वेळी श्रीकांत कुलकर्णी म्हणाले, आजकाल दानाचे स्वरूप कसे आहे त्यावर लोक दान करतात. शिक्षकांनी दान करून केलेला उपक्रम माणूसकी जिवंत ठेेवणारा आहे. शिक्षकांंनी तालुक्यात झिरो डेथचे काम केले.आज आरोग्य विभागात आनेक कामे शिक्षक करतात. त्याचबरोबर शिक्षक कुठेही सामाजिक कार्यात मागे नाही असेही कुलकर्णी म्हणाले. या वेळी गटाविकास आधिकारी आर. एस. कांबळे यांनी शिक्षकांचे कार्य संवेदनशिल असते. नेहमी मदतीची भावना त्यांची असते असेही सांगितले. प्रास्ताविक शिक्षक काळे यांनी केले. सूत्रसंचालन शेख आसेफ यांनी केले. या कार्याक्रमास शिक्षक केंद्रप्रमूख उपस्थित होते.
===Photopath===
220521\img_20210522_162645_14.jpg