निवडणुकाचे वारे, वाहन तपासणीत १ कोटी ९० लाख आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:57 PM2019-03-19T22:57:09+5:302019-03-19T22:57:37+5:30
बीड-अहमदनगर रस्त्यावर अंमळनेरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरवाडी फाट्यावर असलेल्या निवडणूक विभागाच्या चेकपोस्टवर हा प्रकार घडला.
बीड : निवडणूक पथकाने वाहनाच्या केलेल्या तपासणीत जवळपास १ कोटी ९० लाख इतकी रक्कम गाडीत आढळून आली. ही रक्कम कशाची होती? याचा खुलासा झाला नसून, संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. गोण्या भरून ही रक्कम होती.
बीड-अहमदनगर रस्त्यावर अंमळनेरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरवाडी फाट्यावर असलेल्या निवडणूक विभागाच्या चेकपोस्टवर हा प्रकार घडला. मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास एमएच२३/यू२००० ही मर्सिडिज कार बीडहून नगरकडे जात होती. या गाडीत रोशन विजयराज बंब होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने विविध रस्त्यावर चेकपोस्ट निर्माण केले असून, याद्वारे येणाºया-जाणाºया वाहनांची तपासणी केली जाते. ही कार नगरकडे जाताना चेकपोस्टच्या कर्मचाºयांनी अडवली. तपासणी केली असता गाडीत ही रक्कम आढळून आली. १० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यामुळे नियमानुसार जिल्हा आयकर अधिकारी रंगदळ यांना ही माहिती दिली. औरंगाबादहून आयकर अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले होते. घटनास्थळी पाटोदा तहसीलदार रुपा चित्रक, एसडीएम नम्रता चाटे, सपोनि विशाखा धुळे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाचे राख यांनी ही कारवाई केली.