लॉकडाऊन काळात प्रशासनावर ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:16+5:302021-03-26T04:34:16+5:30

बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आजपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विविध ठिकाणी ...

During the lockdown, the administration was under increasing pressure | लॉकडाऊन काळात प्रशासनावर ताण वाढला

लॉकडाऊन काळात प्रशासनावर ताण वाढला

Next

बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आजपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विविध ठिकाणी सेवा देणे अत्यावश्यक असते, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. तर, यामुळे प्रशासनावरील ताणदेखील वाढला आहे.

बीड जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी पोलीस, महसूल व जि.प.चे कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्या ठिकाणी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. तर, बाहेर जाणाऱ्यांना देखील प्रशासनाची परवानगी असणे बंधनकारक आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जणार आहे. लॉकडाऊनच्या संदर्भात जनजागृती देखील केली जाणार आहे. या काळात परवानगी असणाऱ्यांची कागदपत्रे तपासून त्यांना सूट देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर व विद्यार्थी तसेच शिक्षकांना देखील मुभा दिली आहे. लॉकडाऊनचे पालन नागरिकांनी करावे तसेच कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घरी बसून घ्यावी, तसेच आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. असे ‌आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर, नागरिकांना मारहाण न करता, समजून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हाभरात पोलीस प्रशासनाकडून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. तर, नाकाबंदीवर देखील चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नागरिकांनी करावे, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

आर. राजा पोलीस अधीक्षक बीड

===Photopath===

250321\252_bed_21_25032021_14.jpg

===Caption===

चेकपोस्ट फोटो 

Web Title: During the lockdown, the administration was under increasing pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.