सोयाबीन पेरणीदरम्यान शेतकऱ्यांनी चतु:सूत्रीचा अवलंब करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:37+5:302021-04-29T04:25:37+5:30
बीड : जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. यावर्षी देखील विक्रमी पेरणी ...
बीड : जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. यावर्षी देखील विक्रमी पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. दरम्यान सोयाबीन पेरणी करत असताना चतु:सूत्रीची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सोयाबीन पेरणी करण्यासाठी शक्यतो शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरावे तसेच सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी करावी, पेरणी करण्यापुर्वी बियाणास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, पेरणी करताना बी.बी.एफ म्हणजे रुंद सरी वरंबा या पद्धतीने पेरणी करावी जेणेकरून उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल, या चतु:सूत्रीचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पदानात वाढ होणार आहे. त्यासंदर्भात बीड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व गावांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे.
सोयाबीन लगावडीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणीकरिता कृषी सहाय्यकामार्फत विविध गावांमध्ये उगवणक्षमता तपासणी पीक प्रात्यक्षिके घेण्यात येत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. उगवण क्षमता तपासणी जर ७० टक्के येत असेल तर ७५ किलो प्रति हेक्टर सोयाबीन बियाणांचा वापर करावा. जर उगवण क्षमता कमी असेल तर प्रति एक टक्के याला अर्धा किलो बियाणे अशा प्रमाणात बियाणे वाढवावे जर उगवण क्षमता ६० टक्के पेक्षा कमी असेल तर अशा पद्धतीच बियाणं शक्यतो वापरू नये त्याचबरोबर बियाणास जिवाणूसंवर्धक व तसेच रासायनिक कीटकनाशक याची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जेणेकरून पेरणी झाल्यानंतर असे पीक कीड व रोगास कमी प्रमाणात बळी पडते तसेच जिवाणूसंवर्धकामुळे पिकाची जोमदार वाढ होते. आणि लागवड करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी जेणेकरून पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होऊन, जास्ती जास्त ओलावा पिकाच्या मुळांमध्ये धरुन ठेवला जातो व याचा फायदा उत्पन्न वाढीमध्ये होतो.
चतु:सूत्री चा वापर करून सोयाबीन पिकाची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सोयाबीन पेरणी करत असताना शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासून घरचे बियाणे वापरावे, तसाच वरील चतुसूत्रीचा अवलंब करून, उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करावे. या कामासाठी गावातील संबंधित कृषी सहाय्याकाची मदत शेतकऱ्यांनी घ्यावे. तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
बी.आर गंडे, तालुका कृषी अधिकारी बीड
===Photopath===
280421\28_2_bed_9_28042021_14.jpg
===Caption===
सोयाबीन