भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या सावरगावातील सभेला प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 06:40 PM2017-09-30T18:40:44+5:302017-09-30T19:11:49+5:30

मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले.

Dusshera rally, Pankaja Mundane's Savargaon rally in the birthplace of Lord Baba | भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या सावरगावातील सभेला प्रचंड गर्दी

भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या सावरगावातील सभेला प्रचंड गर्दी

Next

बीड - मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. तर तिकडे महंत नामदवेशास्त्रींच्या विरोधानंतर भगवानगडाची गर्दी ओसरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भगवान गडाची नाळ तुटली; आता बाबांचे जन्मस्थळ हेच समाजाचे शक्तीस्थान, असेही प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

एरवी दसऱ्याला भक्तांनी फुलुन जाणाऱ्या भगवानगडावर नेहमीसारखी गर्दी पाहायला मिळाली नाही. यंदा ते चित्र उलट पाहायला मिळालं. यंदा भगवानगडावर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर सावरगावात पंकजा मुंडे यांच्या सभेला प्रचंड जनसागर लोटला या मेळाव्याला महादेव जानकर, राम शिंदे यांच्यासह पंकजा मुंडेंचे अनेक समर्थकही हजर होते.

महंत नामदेवशास्त्रींनी भगवानगडावर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांना विरोध केल्यानंतर, पंकजा मुंडेंनी यंदाचा दसरा मेळावा भगवानगडाच्या जन्मगावी म्हणजे बीडमधील सावरगावात घेण्याचा निर्णय घेतला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी समजाबांधवांना भावनिक साद देत त्यांना सर्वांगीण विकासाचे आश्वासनही दिले.

नामदेव शास्त्रींचा पंकजांना विरोध
पंकजा मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्रींना पत्र लिहून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम असून भगवान गडावर राजकीय भाषण करण्यास त्यांचा तीव्र विरोध केला होता.

प्रशासनानेही परवानगी नाकारली
पंकजा मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.
 

Web Title: Dusshera rally, Pankaja Mundane's Savargaon rally in the birthplace of Lord Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.