रस्त्यावर धुळीचे थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:52+5:302021-06-01T04:24:52+5:30
हिंगणी रस्ता खराब बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त ...
हिंगणी रस्ता खराब
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघाताची उदाहरणे आहेत. जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे; परंतु अद्यापही याकडे दुर्लक्षच केले जात आहे.
केबल चोरी वाढली
अंबाजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यांतून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युत पंप चालवण्यासाठी केबल अंथरण्यात आले होते. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.
रिंग रोड रस्त्याची दुर्दशा
अंबाजोगाई : शहरातील रिंग रोड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम रखडल्याने हा पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.